• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'Sukh Mhanje Nakki Kay Asta'मध्ये रंगणार सामना; कबड्डी शिकवण्यासाठी हा कलाकार मैदानात

'Sukh Mhanje Nakki Kay Asta'मध्ये रंगणार सामना; कबड्डी शिकवण्यासाठी हा कलाकार मैदानात

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (sukh mhanje nakki kay asta) मालिकेत कबड्डीचा सामना रंगणार आहे. यावेळी मालिकेत एका नव्या कलाकाराची एंट्री होणार आहे.

 • Share this:
  मुंबई 19 ऑक्टोबर :  'सुख म्हणजे नक्की काय असतं'  (sukh mhanje nakki kay asta)  ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेपैकी एक आहे. सध्या ही मालिका एका रंगतदार वळणावर आहे. मालिकेत सुडाने पेटलेली शालिनी संपूर्ण शिर्के-पाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवत आहे. घरचा आणि कंपनीचा ताबा  (sukh mhanje nakki kay asta latest episode) मिळवल्यानंतर शालिनीने तिचा मोर्चा अन्य मालमत्तेकडे वळवला आहे. यामध्येच आता ही मालमत्ता मिळवण्यासाठी तिने जयदीपसोबत कबड्डीचा सामना आयोजित केला आहे. ही मालमत्ता परत हवी असल्यास माझ्यासोबत कबड्डीचा डाव जिंकावा लागेल अशी अट शालिनीने घातली आहे. त्यामुळे शिर्केपाटील कुटुंबासमोर सामना जिंकण्याचा एकमेव पर्याय उरला आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी शिर्केपाटील कुटुंबाला एक प्रशिक्षकाची गरज आहे. अशातच आता मालिकेत प्रशिक्षकाच्या रूपात एका नव्या पात्राची एंट्री  (milind shinde entry as kabaddi coach) होणार आहे. ज्यामुळे मालिका आधिक रंगतदार होणार आहे. आतापर्यंत नकारात्मक भूमिकेत दिसणारा अभिनेता आता या मालिकेत प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा अभिनेता म्हणजे मिलिंद शिंदे आहे. मिलिंद शिंदे यांना आतापर्यंत आपण नकारात्मक भूमिकेत पाहिलं आहे मात्र या मालिकेतून आपण त्यांच्या अभिनयाची एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे.
  या भूमिकेविषयी सांगताना मिलिंद शिंदे म्हणाले की, "मी कोच म्हणजे प्रशिक्षकाची भूमिकेत या मालितेत दिसणार आहे. भैरु असं त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. मी पहिल्यांदाच प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारतो आहे. मी दिल्लीला शिकायला होतो तेव्हा काही शाळा आणि कॉलेजमध्ये वर्कशॉप घ्यायचो. त्याचीच मदत मला ही व्यक्तिरेखा साकारताना होते आहे. वाचा : Manike Mage Hithe फेम Yohaniची बॉलिवूडमध्ये एंट्री; 'या' सिनेमातून करणार पदार्पण तसेच ते पुढे म्हणाले की,मी कबड्डी कधीच खेळलो नाहीय. शाळेत असल्यापासून फक्त आणि फक्त नाटक केलं आहे. मला क्रिकेट खेळायला आवडतं पण मला जमत नाही. त्यामुळे ही भूमिका नक्कीच आव्हानात्मक आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आणि या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात त्यामुळे या मालिकेचा भाग होता आला याचा आनंद आहे.’ वाचा : 2 दिवसांतच शिकली बुलेट चालवायला; पाहा संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा SWAG त्यामुळे हा प्रशिक्षक शिर्के-पाटील कुटुंबाला कबड्डीचा सामना जिंकण्यासा मदत करून त्यांनी त्याची मालमत्ता परत मिळवून देणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. यासोबत मालिकेत मिलिंद शिंदे यांना पाहण्यासाठी देखील प्रेक्षक अतुर आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published: