Home /News /entertainment /

सुख म्हणजे नक्की काय असतं : सतत एकमेकांसोबत भांडणाऱ्या शालिनी- मल्हारचा रोमॅंटिक डान्स पाहिला का?

सुख म्हणजे नक्की काय असतं : सतत एकमेकांसोबत भांडणाऱ्या शालिनी- मल्हारचा रोमॅंटिक डान्स पाहिला का?

सुख म्हणजे नक्की काय असतं : मालिकेत शालिनी आणि मल्हारचे नेहमी एकमेकांसोबत खटके उडत असतात. मालिकेत जरी या जोडीचे खटके उडत असले तरी सोशल मीडियावर या दोघांची चांगलीच क्रेझ पाहायला मिळते.

  मुंबई, 24 मे- सुख म्हणजे नक्की काय असतं  (  sukh mhanje nakki kay asta  ) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. मालिकेती (  sukh mhanje nakki kay asta latest update  )  गौरी आणि जयदीपची सर्वांची आवडती जोडी आहे. शिवाय मालिकेत शालिनी आणि मल्हारची जोडी देखील प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. मालिकेत शालिनी आणि मल्हारचे नेहमी एकमेकांसोबत खटके उडत असतात. शालिनीची भूमिका मालिकेत नकारात्क आहे पण तिच्या विनोदी शैलीने ती प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसते. मालिकेत जरी या जोडीचे खटके उडत असले तरी सोशल मीडियावर या दोघांची चांगलीच क्रेझ पाहायला मिळते. सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेत शालिनीची भूमिका अभिनेत्री माधवी निमकर साकारताना दिसते. तर मल्हारची भूमिका कपिल होनराव साकारताना दिसतो. नुकताच या दोघांच्या मालिकेचा सेटवरील एक रोमॅंटिक व्हिडिओ (  kapil honrao maadhavi nemkar dance video)   सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही ये तेरी चाँद बालियां...या हिंदी गाण्यावर रोमॅंटिक अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या दोघांचा प्रेमळ अंदाज पाहून चाहते देखील यांच्या प्रेमात पडले आहेत. चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
  शालिनी आणि मल्हार ही जोडी  रसिकांची आवडती जोडी आहे. मल्हार ही भूमिका साकारणारा अभिनेता कपिल होनराव मालिकेमुळे वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. कपिल रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. सोशल मीडियावरही तो सक्रीय असतो. फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. सोशल मीडियावर प्रचंड मोठा त्याचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. याशिवाय माधवीचा देखील सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या