Home /News /entertainment /

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील मराठमोळ्या गौरीच्या लुकमध्ये होणार बदल ; मालिकेत पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट?

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील मराठमोळ्या गौरीच्या लुकमध्ये होणार बदल ; मालिकेत पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट?

Sukh Mhanje Nakki Kay Asata : सुरूवातीला साधीभोळी दिसणारी गौरी लग्नानंतर तिच्या लुकमध्ये मोठा बदल केला हा बदल प्रेक्षकांनी देखील स्वीकारला आहे. आता गौरीच्या लुकमध्ये पुन्हा बदल होणार आहे.

  मुंबई, 28 फेब्रुवारी- स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ही मालिका प्रेक्षकांची आवडी मालिका आहे. मालिकेतील जयदीप आणि गौरीची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. सुरूवातीला साधीभोळी दिसणारी गौरी लग्नानंतर तिच्या लुकमध्ये मोठा बदल केला हा बदल प्रेक्षकांनी देखील स्वीकारला आहे. आता गौरीच्या लुकमध्ये पुन्हा बदल होणार आहे. याचा एक प्रोमो व्हिडिओ देखील समोर आला आहे. एका पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार गौरीचा लुक बदलला आहे. मराठमोळी गौरी आता साऊथ इंडियन लुकमध्ये दिसणार आहे. गौरीच्या लुकमागे मोठा ट्विस्ट तर लपलेला नाही ना अशी शंका आता प्रेक्षकांच्या मनात येऊ लागली आहे. तसेच गौरीचा हा साऊथ इंडियन लुक प्रेक्षकांच्या पचनी पडणार का याची देखील उत्सुकता लागली आहे. वाचा- या कारणासाठी आलियाला सोडावं लागलं शिक्षण, नेमकी कधी सुटली शाळा? मागच्या काही दिवसांपासून मालिकेत गौरी आई होऊ शकणार नाही याचा ट्रॅक सुरू आहे. यानंतर जयदीप आणि गौरीनं देखील सरोगसीद्वारे मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मानसीने पुढाकारही दाखवला. मात्र मानसीचा खरा डाव आता गौरीला समजला आहे. गौरी आई होऊ शकत नाही असे खोटे रिपोर्ट्स मानसीने शालिनीच्या मदतीने तयार केले आहेत. वाचा-उर्फीने कहर केला..शेअर केला भलताचं video ; फॅन्स म्हणाले, 'ही फसवण गौरीला आता मानशीचा सर्व प्लॅन समजला आहे. शालिनी आणि मानसीचं प्लॅन गौरी जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र जयदीप गौरीसमोर मानसीच्या हाताला किस करतो आणि गौरीला उंच कड्यावरून ढकलून देतो. त्य़ामुळे मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  जयदीपने गौरीसोबत असं का केले..याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. हे गौरीचं स्वप्न तर नाही ना या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या भागात मिळणार आहे. या सगळ्य़ाशी गौरीच्या बदलेल्या लुकचा काय संबंध असा देखील प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या