मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत येणार नवा ट्विस्ट ; गौरीच्या वडिलांच्या मृत्यूमागचं सत्य येणार समोर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत येणार नवा ट्विस्ट ; गौरीच्या वडिलांच्या मृत्यूमागचं सत्य येणार समोर

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं या  (sukh mhanje nakki kai asta latest episode ) मालिकेत लवकरच एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 7 डिसेंबर- स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं या  (sukh mhanje nakki kai asta latest episode ) मालिकेत लवकरच एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नुकतेच गैरी आणि जयदीपचे थाटामाटात पुन्हा लग्न पार पडले आहे. घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. आता हा आनंद मात्र जास्त काळ टिकणार नाही. कारण गौरीसमोक एक मोठं सत्य येणार आहे.

लहानपणापासून गौरी शिर्के- पाटील यांच्या घरी राहत आहे. आता मात्र ती या घरची सून झाली आहे. आता तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा केला आहे. तिच्या वडिलांचा खून गुंडानी नाही तर दादासाहेबांनी केलाय तेव्हा गौरी कशी वागणार तिची प्रतिक्रिया असणार हे येणाऱ्या भागात समजणार आहे. एका पोर्टलने याबाबत वृत्त दिलं आहे. यामुळे कोणते नवे वादळ शिर्के- पाटील कुटुंबामध्ये येणार व याचा कुटुंबावर काय परिणाम होणार हे देखील येणाऱ्या भागात समजेल.

वाचा :सलमानच्या एक्स गर्लफ्रेंड आता जगतात असं आयुष्य, करतात हे काम!

स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौरी-जयदीपच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख आलं आहे. दोघांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता ते पुन्हा विवाहबंधनात अडकले आहेत. शिर्केपाटील कुटुंबात प्रत्येत समारंभ अगदी थाटामाटात पार पडतो. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्नही अगदी शाही थाटात पार पडले. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, संगीत, हळद आणि वरात असा सगळा थाट लग्नात पाहायला मिळाला.

नऊवारी साडीत गौरीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलंय. तर जयदीपही धोतर, फेटा अश्या पारंपरिक लूकमध्ये देखणा दिसत होता. माई-दादा गौरीला मुलीप्रमाणे मानतात. त्यामुळे लग्नात गौरीच्या आई-वडिलांची जबाबदारी माई-दादांनीच पार पाडली आहे. या सगळ्यात विशेष लक्ष वेधून घेतंय ते गौरीचं मंगळसूत्र. जयदीपच्या प्रेमाची निशाणी असलेलं मोरपीस गौरीने लहानपणापासून जपून ठेवलं होतं. हीच निशाणी तिच्या मंगळसूत्रामध्येही जपली जाणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials