स्टार प्रवाहवर ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ ही मालिका आपल्या भेटीला येते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील गौरी आणि जयदीपची आगळीवेगळी केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच पसंत पडते. मालिकेत सध्या या दोघांमध्ये प्रेम फुललं आहे. मात्र सुरुवातीला मालिकेत दाखवण्यात आलं होतं, जयदीपच्या इच्छेविरुद्ध हे लग्न झालेलं असत. जयदीप हा अमेरिकेहून शिक्षण घेऊन आलेला मुलगा तर गौरी ही त्याच्याचं घरात मोलकरीण म्हणून काम करणारी मुलगी असं दाखवण्यात आलं होतं. मात्र अनेक संकटांवर मात करून या दोघांनी आपलं नात जपलं आहे. आणि आत्ता या दोघांमध्ये प्रेमाचं अंकुर फुटत आहे. (हे वाचा:मृण्मयी देशपांडेचा स्वॅग; 'मुंबई डायरीज'मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला) नुकताच स्टार प्रवाहने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये गौरी आणि जयदीप स्टेजवर बाप्पाच्या गाण्यावर डान्स प्रॅक्टिस करताना दिसून येत आहेत. स्टार प्रवाहवर सध्या बाप्पाच्या आगमनाची जंगी तयारी सुरु आहे. सर्वच कलाकार मोठ्या उत्साहाने बाप्पाला खुश करण्यासाठी मेहनत घेत आहेत. गौरी आणि जयदीप ‘रांजणगावाला...महागणपती नांदतो’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.