Home /News /entertainment /

मुक्ता बर्वेच्या 'Y' सिनेमाला खासदार सुजय विखेंचा पाठिंबा, फोटो पोस्ट करत म्हणाले..

मुक्ता बर्वेच्या 'Y' सिनेमाला खासदार सुजय विखेंचा पाठिंबा, फोटो पोस्ट करत म्हणाले..

मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या 'वाय' (Y) या सिनेमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली दिसत आहे.. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. अनेक कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर हातामध्ये 'वाय' अक्षर लिहीलेले पोस्टर घेऊन चित्रपटाला पाठिंबा देत आहेत.

पुढे वाचा ...
  मुंबई, 25 मे- मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या 'वाय' (Y) या सिनेमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली दिसत आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. या सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वे (mukta barve) प्रमुख भूमिकेत आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. अनेक कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर हातामध्ये 'वाय' अक्षर लिहीलेले पोस्टर घेऊन चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. आता यामध्ये एक राजकीय क्षेत्रातील मोठ्या नावाचा देखील समावेश झाला आहे. या राजकीय नेत्याने देखील या सिनेमाला पाठिंबा दिला आहे. भाजप खासदार सुजय विखे पाटील (  sujay vikhe patil )  हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर Y अक्षर लिहिलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, ythefilm ला माझा पाठिंबा आहे ! आपला...? त्यामुळे अनेकांना ‘वाय’ नक्की आहे तरी काय याची उत्सुकता लागली आहे. वाचा-MahaMinister: आदेश भावोजींचं रत्नागिरीत दणक्यात स्वागत! वहिनींसोबत काढले सेल्फी मुक्ताच्या आगामी सिनेमाचं नाव वाय आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. तिर सिनेमाची निर्मिती कन्ट्रोल एन् प्रॉडक्शनने केली आहे. हा सिनेमा सत्य घटनांवर आधरित आहे. मुक्ता बर्वे या सिनेमात मुख भूमिकेत आहे. सिनेमाचं पोस्टरची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पोस्टर पाहून सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. 24 जूनला सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. मुक्ताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Y The Film (@ythefilm)

  मुक्ता बर्वेने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपला ठसा उमटविला आहे. आम्हाला वेगळे व्हायचेय हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचे नाटक खूप गाजले होते. त्यानंतर ती घडलं- बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये दिसली. तिने थांग, देहभान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर जोगवा, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई सारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या