S M L

Sui Dhaaga Trailer- सब बढ़िया है...

वरुणचा अभिनय जमेची बाजू आहे तर अनुष्का पहिल्यांदा नॉन ग्लॅमरस लूकमध्ये दिसतेय

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2018 04:37 PM IST

Sui Dhaaga Trailer- सब बढ़िया है...

वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्या 'सुई धाना- मेड इन इंडिया' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ३ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये संपूर्ण सिनेमाच्या कथेला सुंदरपद्धतीने मांडण्यात आले आहे. ही गोष्ट आहे ममता आणि मौजीची. आयुष्यात कठीण प्रसंग आल्यानंतर गर्भगळीत न होता येणाऱ्या प्रत्येक संकटांवर दोघं मात करत पाहिलेली स्वप्न पूर्ण करत जातात. अथक परिश्रम करुन ते अशक्य वाटणारं स्वप्न पूर्ण करतात. वरुण आणि अनुष्काचा अभिनय या सिनेमाची जमेची बाजू असेल यात काही शंका नाही. शरत कटारिया यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

शरत यांनी याआधी 'दम लगाके हैशा' या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून मनीष शर्मा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. अन्नू मलिक यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. सिनेमाचे बहुतांश चित्रीकरण मध्य प्रदेशमध्ये झाले आहे. ट्रेलरमध्ये वरुण मौजी नावाची देसी व्यक्तिरेखा साकारत आहे. वरुणचा अभिनय जमेची बाजू आहे. अनुष्का पहिल्यांदा नॉन ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. यशराज बॅनर अंतर्गत बनवण्यात आलेला सुई- धागा सिनेमातून अनोखी प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. यावर्षी २८ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2018 04:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close