S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शाहरूखच्या मुलीचा हाॅट अवतार, व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : शाहरूखच्या मुलीचा हाॅट अवतार, व्हिडिओ व्हायरल

    Published On: Aug 1, 2018 10:43 PM IST | Updated On: Aug 1, 2018 10:48 PM IST

    आता शाहरुख खानची लाडली सुहाना खान चर्चेत आलीये एका खास कारणामुळे. किंग खानची ही लेक चक्क व्होगच्या कव्हरपेजवर झळकतेय. व्होगच्या मासिकावर सुहानाचा चेहरा रिव्हिल केला तोही शाहरुख खाननेच व्होग ब्युटी अवॉर्ड्सदरम्यान. सुहाना खान शाळा-कॉलेजमध्ये नाटकात सहभागी होत असे आणि तिला सिनेमा खूप आवडतो.त्यामुळे पित्याच्या पावलावर पाऊल टाकत तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तर आश्चर्य वाटायला नको. व्होगचं हे कव्हरपेज याचीच पाऊलखूण तर नाही ना? पण अनेकांनी यावर टीकाही केलीय. सुहाना खान इतक्या मोठ्या मासिकाच्या कव्हरपेजवर कशी काय? असा प्रश्न अनेकांनी विचारलाय. ही बाॅलिवूडची घराणेशाही आहे, असंही काहींनी म्हटलंय. मध्यंतरी सुहानाच्या वाढदिवसाला पप्पा शाहरुख खाननं तिला सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहिली. त्यानं म्हटलंय, 'मला माहीत आहे की तू उडण्यासाठीच जन्मलीयस.' गौरी खाननंही तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close