मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aryan Khanला जामीन मिळाल्यानंतर बहीण Suhana ने म्हटले हे तीन शब्द; खास फोटोही केला शेअर

Aryan Khanला जामीन मिळाल्यानंतर बहीण Suhana ने म्हटले हे तीन शब्द; खास फोटोही केला शेअर

7 दिवसांनंतर बॉलिवूड (Bollywood) किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) चेहऱ्यावर आनंद दिसला आहे. त्याचा  लाडका मुलगा आर्यन खान (Aryan Khan Bail) याला अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने दाखल केलेल्या अमली पदार्थाच्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 29ऑक्टोबर-  27 दिवसांनंतर बॉलिवूड (Bollywood) किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) चेहऱ्यावर आनंद दिसला आहे. त्याचा  लाडका मुलगा आर्यन खान (Aryan Khan Bail) याला अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने दाखल केलेल्या अमली पदार्थाच्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर बहीण सुहाना खानने (Suhana Khan) इंस्टाग्रामवर एका खास फोटोद्वारे हा आनंद व्यक्त केला आहे.फोटोसोबत तिने अत्यंत खास पद्धतीने फक्त तीन शब्द लिहून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहाना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. परंतु  तिचा भाऊ आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर तिने सोशल मीडियापासून काहीसं  अंतर ठेवलं होतं. पण भावाला जामीन मिळाल्यानंतर तिने पुन्हा बालपणीचे दिवस आठवणारा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहरुख खान मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानासोबत मजामस्ती करताना दिसत आहे.हे   आनंदाचे क्षण व्यक्त करणारा  हा फोटो  तिघांच्या चार मोनोक्रोम फोटोंचा  कोलाज आहे. कॅप्शन देत 'आय लव्ह यू'  हे तीन शब्द म्हटले आहेत.सुहानाच्या या पोस्टवर तिच्या मैत्रिणी आणि चाहते भरभरून कमेंट करत आहेत.

त्याचवेळी लहान भाऊ अबराम खानही मोठ्या उत्साहात दिसून आला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर आर्यन खानचा जामीन मंजूर झाल्याची बातमी येताच अबराम खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये अबराम खान पिता शाहरुख खानच्या चाहत्यांशी आणि पापाराझींसोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे.

(हे वाचा:Aryan khan bail: 25 दिवसांनंतर 'मन्नत' पूर्ण; आर्यन खानची तुरुंगातून ... )

गेल्या अनेक दिवसांपासून शाहरूख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खान याच्या जामीनासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर आज २७ दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्याला जामीन मंजूर (Aryan Khan, Munmun Dhamecha, Arbaaz Merchant granted bail) केला आहे. 3 ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती.या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर 7 जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं होतं.  त्यांनतर या प्रकरणाला अतिशय गंभीर वळण लागलं होतं. यामध्ये दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. इतकंच नव्हे तर अभिनेत्री अनन्या पांडेच नावसुद्धा यामध्ये  पुढं आलं होतं. आर्यन आणि अनन्याचे व्हॉट्सअप चॅट्स समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती.

First published:

Tags: Aryan khan, Entertainment, Suhana khan