मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aryan Khan च्या वाढदिवसानिमित्त Suhana ने शेअर केला बालपणीचा खास फोटो; तुम्हीही पाहा स्टारकिड्सचा Unseen Photo

Aryan Khan च्या वाढदिवसानिमित्त Suhana ने शेअर केला बालपणीचा खास फोटो; तुम्हीही पाहा स्टारकिड्सचा Unseen Photo

बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan Birthday) आज २४ वर्षांचा झाला. आज आर्यन खानचा वाढदिवस आहे. गेली अनेक दिवस ड्रग्स प्रकरणामुळे आर्यन खान चर्चेत होता.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan Birthday) आज २४ वर्षांचा झाला. आज आर्यन खानचा वाढदिवस आहे. गेली अनेक दिवस ड्रग्स प्रकरणामुळे आर्यन खान चर्चेत होता.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan Birthday) आज २४ वर्षांचा झाला. आज आर्यन खानचा वाढदिवस आहे. गेली अनेक दिवस ड्रग्स प्रकरणामुळे आर्यन खान चर्चेत होता.

मुंबई, 12 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan Birthday) आज २४ वर्षांचा झाला. आज आर्यन खानचा वाढदिवस आहे. गेली अनेक दिवस ड्रग्स प्रकरणामुळे आर्यन खान चर्चेत होता. अनेक गंभीर आरोप त्याच्यावर लागले आहेत. मात्र गेल्याच आठवड्यात त्याला जामीन मिळाला आहे. त्यामुळे शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब खूपच आनंदात आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने बहीण सुहाना खानने आर्यन खानसोबतच एक बालपणीचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सध्या आपल्या शिक्षणासाठी न्यूयॉर्कमध्ये राहात आहे. मात्र ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बॉलिवूडमध्ये एंट्री केली नसली तरी तिचा एखाद्या अभिनेत्री इतका मोठा चाहतावर्ग आहे. चाहते सतत त्याच्या पोस्टवर लक्ष ठेऊन असतात.त्यामुळे ती सतत चर्चेत असते. नुकताच सुहानाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हाच फोटो तिची कजिन आलिया चिबानेसुद्धा शेअर केला आहे. आज भाऊ आर्यन खानच्या वाढदिवसाचं निमित्त साधत हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो आर्यन खान आणि सुहाना खानच्या बालपणीचा फोटो आहे. सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुहाना खानने शेअर केलेल्या बालपणीच्या फोटोमध्ये ती आपली कजिन आलिया चिबासोबत छोट्याशा ढकलगाडीवर बसली आहे. तर आर्यन खान कजिन अर्जुन चिबासोबत उभा आहे. या फोटोमध्ये सर्वच फार लहान आहेत. हा फोटो पाहून चाहते फारच खुश झाले आहेत. सोबतच फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा येत आहेत.दरम्यान कजिन अर्जुन चिबानेसुद्धा आर्यन खानचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत त्याने 'मला माहिती आहे खूपच मजबूत लोक आहेत हे' असं कॅप्शनही लिहिलं आहे.

गेली अनेक दिवस शाहरुख खान आणि आर्यन खान ड्रग्स केसमुळे चर्चेत आहेत. या काही दिवसांत अभिनेत्याला अनेक कठीण प्रसंगातून जावं लागलं आहे. ३ ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती. या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर ७ जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं होतं. तब्बल २५ दिवसांनंतर म्हणजेच २८ ऑक्टोबरला आर्यन खानचा जामीन मंजूर करण्यात आला होता

First published:

Tags: Aryan khan, Bollywood, Entertainment, Shahrukh khan, Suhana khan