Home /News /entertainment /

Aryan Khan च्या अटकेनंतर सुहानाची पहिलीच पोस्ट; आई गौरी खानसाठी लिहिला हा मेसेज

Aryan Khan च्या अटकेनंतर सुहानाची पहिलीच पोस्ट; आई गौरी खानसाठी लिहिला हा मेसेज

सुहानाने आर्यन खानला अटक झाल्यानंतर सोशल मीडियापासून दूर राहणंच पसंत केलं होतं. मात्र आज आईच्या वाढदिवसानिमित्त इतक्या दिवसांनी सुहानाने सोशल मीडियावर हजेरी लावली आहे

मुंबई 08 ऑक्टोबर : बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणी (Drugs) अटक करण्यात (Arrest) आल्यानं खळबळ माजली आहे. सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. सोशल मीडियावर शाहरुख खानचे जुने किस्से, आर्यन खानच्या राजेशाही आयुष्याचे फोटो, स्टार किड्सचे राहणीमान, बॉलिवूडच्या कलाकारांचे ड्रग्जशी असलेले नाते अशा अनेक विषयांवर जोरदार चर्चा सुरू आहे. कलाकारांच्या विरोधाभासी वागण्याचे पुरावे देऊन त्यांना ट्रोल केले जात आहे. तर बॉलिवूड कलाकार शाहरुख खानला आपला पाठिंबा दर्शवत आहेत. आर्यन खानच्या सुटकेसाठी शाहरुख आणि गौरी खान (Gauri Khan) धडपडत आहेत. अशा परिस्थितीत गौरी खानचा आज वाढदिवस (Birthday) आहे. पण सध्या वाढदिवस साजरा करण्याची त्यांची मनस्थिती नाही. आईच्या वाढदिवशी तरी जेलबाहेर येणार का आर्यन खान की वाढणार मुक्काम? या पार्श्वभूमीवर गौरी आणि शाहरुखची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हिनं आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक प्रेमळ पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. बॉलिवूड लाईफनं दिलेल्या वृत्तानुसार, आज गौरी खानचा 51 वा वाढदिवस आहे पण आर्यन तुरुंगात असल्याने शाहरूख आणि गौरी दोघंही अस्वस्थ आहेत. गौरी खान स्वतः एक प्रसिद्ध इंटेरिअर डेकोरेटर आहे. तिचेही फॅन फॉलोअर्स मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळे शाहरुख आणि गौरीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण गौरी खानला सुहाना खाननं दिलेल्या शुभेच्छांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या सुहानाने आर्यन खानला अटक झाल्यानंतर सोशल मीडियापासून दूर राहणंच पसंत केलं होतं. सुहानाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील कमेंट सेक्शनही बंद केला, मात्र आज आईच्या वाढदिवसानिमित्त इतक्या दिवसांनी सुहानाने सोशल मीडियावर हजेरी लावली आहे. सुहाना सध्या शिक्षणासाठी परदेशात आहे. सुहानाने गौरी आणि शाहरुख एकमेकांच्या बाहुपाशात असलेला त्यांचा तरुणपणातील एक सुंदर फोटो शेअर केला असून, त्यावर हॅपी बर्थडे माँ! असे लिहून हार्टचा इमोजी टाकला आहे. सुहानाने आपल्या आईविषयीचे प्रेम, काळजी यातून दर्शवली आहे. सध्याच्या परिस्थितीत आईची मानसिक अवस्था काय झाली असेल याची जाणीव असल्याने सुहानाने आपल्या आईला जणू आपण कायम तिच्या सोबत आहोत असा आश्वासक आधार या पोस्टमधून दिल्याचं जाणवते. सुहानाने अत्यंत प्रेमळपणे आपल्या आईला दिलेल्या या शुभेच्छांनी चाहत्यांचेही लक्ष वेधून घेतलं असून ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. गौरी खानच्या मैत्रिणी, सुहानाच्या मैत्रिणी, बॉलिवूड स्टार्ससह चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट्स करत गौरी खानवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. BREAKING : सुटका नाहीच; आर्यन खानसह सर्व आरोपींबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय आर्यन खान याला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझमध्ये ड्रग्ज घेताना एनसीबीने (NCB) अटक केल्यानंतर न्यायालयानं त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. आज 8 ऑक्टोबर रोजी त्याची न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी त्याला जामीन मिळाल्यास गौरी खानसाठी ही वाढदिवसाची मोठी भेट असेल.
First published:

Tags: Aryan khan, Shahrukh khan

पुढील बातम्या