'काही दिवसांनी तर तुला लग्नच करायचं आहे', शाहरुखच्या मुलीला मिळाला अजब सल्ला!

सुहानाच्या एका फॅनपेजने तिचा याच प्रोजेक्ट दरम्यानचा एक फोटो सोशल मी़डियावर शेअर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 04:47 PM IST

'काही दिवसांनी तर तुला लग्नच करायचं आहे', शाहरुखच्या मुलीला मिळाला अजब सल्ला!

मुंबई. 26 ऑगस्ट- बॉलिवूडची फेमस स्टार किड सुहाना खान सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, तिचा अजून एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवरील एका फॅनपेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. सुहानाने नुकतंच तिचं ग्रॅज्युएशन लंडनमधील आर्डिगली कॉलेजमधून केलं.

सध्या ती शॉर्ट फिल्म 'द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू'मध्ये काम करत आहे. सुहानाच्या एका फॅनपेजने तिचा याच प्रोजेक्ट दरम्यानचा एक फोटो सोशल मी़डियावर शेअर केला आहे. सुहानाच्या या फोटोवर काहींनी चांगल्या कमेन्ट केल्या आहेत तर काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तिच्या एका कट्टर चाहत्याने तू राजकुमारी सारखी दिसतेस तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, काही दिवसांनी तर तुला लग्नच करायचं आहे.

 

Loading...

View this post on Instagram

 

Press Triple Tap to Save the Picture 💞😍🙈

A post shared by Suhana Khan (@suhanakhanteam) on

'द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू' या शॉर्ट फिल्ममध्ये सुहाना अभिनय करणार आहे. या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन तिचाच मित्र थियो जिमेनो करत आहे. जिमेनो ने सिनेमाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं. या पोस्टरवर सुहानासोबत रॉबिन गोनेलाही दिसत आहे. याआधी सुहानाने काही काळ थिएटरमध्येही काम केलं. आता सर्वांनाच तिच्या या शॉर्ट फिल्म प्रदर्शित होण्याची उत्सुकता लागली आहे.

...आणि अचानक अक्षय कुमारच्या मुलाच्या मागे लागले भिकारी

'हर बार पंजाबी क्यों, इस बार मराठी में होगा!' Dream Girl चं प्रमोशन साँग मराठीत!

अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीचं ब्रेकअप, प्रेग्नंट असल्याची झाली होती चर्चा

VIDEO: हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले; तापी नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...