शाहरुखच्या लेकीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, पहिल्या फिल्मचं पोस्टर लाँच

शाहरुखच्या लेकीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, पहिल्या फिल्मचं पोस्टर लाँच

सुहाना एका शॉर्टफिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून या शॉर्टफिल्मचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 7 ऑगस्ट : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. दररोज तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सुहानाचं फॅन फॉलोविंग कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाही. सुहाना बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार हे जाणून घ्यायची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. काही दिवसांपूर्वी सुहाना एका शॉर्टफिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं बोललं जात होतं आणि याचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता या शॉर्ट फिल्मचं पोस्टर समोर आलं असून सध्या सोशल मीडियावर हे पोस्टर खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टरमध्ये सुहाना खान दिसत असून त्याव The Grey Part Of Blue असं टायटल देण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन Theodore Gimeno करत असून पोस्टरमध्ये सुहाना कॅज्युअल लुकमध्ये दिसत आहे. सुहानाच्या या शॉर्ट फिल्मचे काही ऑफ शूट फोटोही समोर आले आहेत ज्यात या शॉर्ट फिल्मची संपूर्ण टीम दिसत आहे.

Article 370 : सिनेमाच्या 'या' नावासाठी निर्मात्यांची रीघ

 

View this post on Instagram

 

#thegreypartofblue art by @olsdavis

A post shared by Theo Gimeno (@theodoregimeno) on

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा लघुपट सुहानाचे मित्र त्यांच्या कॉलेजमध्ये बनवत आहेत. हे जर खरं असेल तर सुहानाला सिनेमांत रुची असल्याचं स्पष्ट होतं. याचबरोबर येत्या काही वर्षांमध्ये ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल यातही काही शंका नाही. सुहाना युकेमध्ये थिएटर आणि सिनेमांचं शिक्षण घेत होती. गेल्या वर्षी शाहरुख मुलीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी युकेमध्ये तिच्या कॉलेजमध्ये गेला होता. नुकतीच ती ग्रॅज्युएट झाली असून तिच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीला शाहरुख आणि गौरीनं हजेरी लावली होती.

आश्चर्यच म्हणायचं ! डाएट न करता खिलाडी अक्षय कुमारनं असं कमी केलं 6 किलो वजन

 

View this post on Instagram

 

Last day at school. To adding new experiences and colours to your life ahead....

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

अभिनयात डेब्यू करण्याधीच सुहानानं दिग्दर्शनात एक वर्षापूर्वीच डेब्यू केला आहे. या आधी मॅग्झीन फोटोशूट चर्चेत राहिल्यांनंतर काही दिवसांपूर्वी सुहानाचे मालदीव व्हेकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते. आपल्या बाबांप्रमाणे सुहाना फार ग्लॅमरस आयुष्य जगते. तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड होत असतात.

सोनाक्षी सिन्हाला अटक झाल्याची बातमी खरी की खोटी? समोर आला हा VIRAL VIDEO

===========================================================================

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आणि पाठकबाई अडकले पुरात; पाहा EXCUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 06:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading