मुंबई, 15 मार्च : किंगखान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्याआधीच तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या कॉलेजमधील फोटो सोशल मीडियावर येतात. तिचे अनेक फोटो देखील व्हायरल होतात. नुकतच तिने तिचं इन्साग्राम अकाउंट पब्लिक केल्यानंतर ते व्हेरिफाइड झालं आहे. मात्र सध्या ती न्यूयॉर्कमधील तिच्या घरी अडकून पडली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. घराबाहेर पडता येत नसल्यामुळे अनेकांची काम खोळंबली आहेत. याचा फटका सुहानाला देखील बसला आहे.
View this post on Instagram
शाहरुख खानची (Suhana Khan) 19 वर्षीय मुलगी सुहाना अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. मात्र घरी बसून रहावं लागत असल्यामुळे अत्यंत दु:खी फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अगदी तिच्या डोळ्यात पाणी आलं आहे. त्याबरोबर तिने एक पाऊट (pout) केलेला फोटो देखील शेअर केला आहे. पूर्ण मेकअप करून तयार असा हा फोटो असल्याने कदाचित सुहाना बाहेर जाण्यासाठी तयार झाली असावी, मात्र कोरोनाच्या भीतीमुळे तिला कुठेच जाता येत नाही आहे.
View this post on Instagram
सुहानाचं अकाउंट नुकतंच व्हेरिफाइड झालं आहे. तरीही काही दिवसातंच तिच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. सध्या तिचे 3 लाख 24 हजार इतके फॉलोअर्स आहेत. या सॅड लूकमधील फोटोची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. कारण सुहाना सोशल मीडियावर तसे फार कमी फोटो अपलोड करते. याआधी तिने अनेक आठवड्यांपूर्वी तिच्या भावांबरोबर फोटो पोस्ट केला होता.
(हे वाचा- कोरोनाचं संकट वाढतंय!तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून यासाठी मेडिक्लेम मिळणार?)
दरम्यान सुहाना लवकरच बॉलिवुडमध्ये पदार्पण करेल अशी चर्चा आहे. एसआरकेचे आणि तिचे फॅन्स तिच्या बॉलिवुड चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे धडे गिरवत आहेत. काही दिवसांपूर्वी सुहाना तिच्या मित्राची शॉर्ट फिल्म ‘द ग्रे शेड ऑफ ब्लू’ मध्ये दिसली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Suhana khan