लॉकडाऊनमध्ये सुहाना खान करतेय हे काम, सोशल मीडियावर Photo Viral

लॉकडाऊनमध्ये सुहाना खान करतेय हे काम, सोशल मीडियावर Photo Viral

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमुळे शाहरुखची मुलगी सुहाना खान चर्चेत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मे : चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसनं आता संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही या व्हायरसचं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आलं आहे. ज्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झाला आहे. नेहमी बीझी असणारे सर्व सेलिब्रेटी सध्या आपापल्या घरी आहेत. सर्वजण सध्या त्यांच्या आवडत्या गोष्टी करताना दिसत आहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सुद्धा तिच्या आवडीचं काम करत आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लॉकडाऊनमुळे सुहाना खान घरातच अडकली आहे. त्यामुळे तिला डान्स क्लासला जाता येत नाही आहे. पण म्हणून म्हणून ती शांत राहिलेली नाही. सुहाना सध्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून घरीच डान्स शिकत आहे. सुहानाची बेली डान्स टीचर संजना मुथरेजा हिनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात सुहाना तिच्याकडून व्हिडीओ कॉलवर नृत्याचे धडे घेताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Dec 2019 #beforelockdown May 2020 #lockdown4 With @suhanakhan2 Level up #onlinebellydanceclass #artofbellydancewithsanjana

A post shared by Sanjana Muthreja (@sanjanamuthreja) on

संजनानं दोन फोटोंचं कोलाज करून ते सोशल मीडियावर शेअर केलं आहे.एका फोटोमध्ये संजना आणि सुहाना एकत्र दिसत आहेत.तर दुसऱ्या फोटोमध्ये या दोघी व्हिडीओ कॉलवर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये संजनानं सांगितलं की, यातला पहिला फोटो हा डिसेंबर 2019चा आहे तर दुसरा फोटो मे 2020 मधला आहे.

संजना मुथरेजाकडे फक्त सुहाना खानच नाही तर अनन्या पांडे, शनाया कपूर या दोघी सुद्धा ऑनलाइन बेली डान्स शिकत आहेत. सुहाना खान तिच्या ग्लॅमरस लुक आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नसतानाही सोशल मीडियावर तिचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2020 07:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading