17 नोव्हेंबर : वादाच्या भोवऱ्यात अडकेल्या पद्मावती सिनेमातील तांत्रिक बाबींवर बोट ठेवत सेन्सॉर बोर्डानं पद्मावती सिनेमात काही बदल करण्याची सूचना निर्मात्यांना केलीय, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. पण पद्मावतीच्या रिलीजच्या तारखेत कोणताही बदल होणार नसल्याचं समजतंय.
पद्मावती सिनेमावरून सुरू असलेला वाद चिघळतच चाललाय. राजस्थानमधल्या चित्तोडगडमध्ये करणी सेनेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. कर्णी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान हवेत गोळीबार केला आणि तलवारी दाखवल्या. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीच हा सर्व प्रकार घडला. जवळपास चार हजार कार्यकर्ते चित्तोडगड किल्ल्याच्या बाहेर आंदोलन करत होते. पर्यटकांनी चित्तोडगडला येऊ नये, असा फतवा करणी सेनेनं काढलाय.
दरम्यान, आंदोलनाचं लोण आता दक्षिण भारतातही परसलंय. कोईम्बतूरमध्येही कर्णी सेनेनं आंदोलन केलं. पण या वादात केंद्र सरकार पडणार नाही, केंद्राने सेन्सॉर बोर्डावरच हा मुद्दा सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.