प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मृत्यूनंतर हळहळली अभिनेत्री अदिती हैदरी; सोशल मीडियावर केली भावुक पोस्ट

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मृत्यूनंतर हळहळली अभिनेत्री अदिती हैदरी; सोशल मीडियावर केली भावुक पोस्ट

याच वर्षात या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेली फिल्म रिलीज झाली होती ज्यामध्ये अदिती राव हैदरीनं (aditi rao hydari) काम केलं. त्याच्या अशा अचानक जाण्यानं तिला मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : मल्याळम चित्रपट दिग्दर्शक शानवास नारानिपुझा (Shanawas Naranipuzha) यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील एका स्थानिक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टमधून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अदिती राव हैदरी हिने शानवास नारानिपुझा (Shanawas Naranipuzha) दिग्दर्शित सुफियम सुजातायम (Sufiyum Sujathayum) या मल्याळी चित्रपटात काम केलं होतं. शानवास नारानिपुझा यांनी आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीला 2015 मध्ये सुरुवात केली होती. करी या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आल्यानंतर त्यांना कोइम्बतूरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर काल रात्री त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तब्येत खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री अदिती राव हैदरी(Aditi Rao Hydari) हिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

"शानवास सर तुम्हाला श्रद्धांजली. तुमच्या कथा जशा हळूवार होत्या तसेच तुम्हीही. सुफियम सुजातायममध्ये तुम्ही जसं आम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेलात तसंच विश्व तुमच्या सुफी आत्म्याला लाभो. तुमच्या कुटुंबाप्रती संवेदना. तुम्ही खूपच लवकर सोडून गेलात", अशी इन्स्टाग्राम पोस्ट करत तिने त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हे वाचा - दादा मला एक वहिनी आण; श्रद्धा कपूरच्या भावाचा निर्मात्याच्या मुलीशी साखरपुडा

सुफियम सुजातायम (Sufiyum Sujathayum)  या चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटामध्ये जयसूर्या, देवमोहन आणि सिद्दीकी यांनी देखील उत्तम भूमिका केल्या होत्या. अदिती राव हैदरी बरोबरच मल्याळम चित्रपटातील अभिनेता विजयबाबू याने देखील आम्ही तुझ्यासाठी खूप प्रयत्न केले असे म्हणत चित्रपटातील त्यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. सुफियम सुजातायम (Sufiyum Sujathayum) हा ऑनलाईन ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा कोरोनाच्या काळातील पहिल्या सात चित्रपटांपैकी एक होता.

हे वाचा - 'केव्हाच लग्न केलं असतं पण ‘तो’ आडवा आला' लग्न लांबण्याबाबत रणबीरचा खुलासा

अदिती हैदरी सध्या आपल्या विविध चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून लवकरच तिचे संमोहनम, साहेब बिवी आणि  गँगस्टर-3 आणि कतरू वेलियादाई हे तीन चित्रपट येणार आहेत. त्याचबरोबर जॉन अब्राहमबरोबर(John Abraham) देखील ती आगामी चित्रपटात दिसणार असून त्यांच्याबरोबर अर्जुन कपूर(Arjun Kapoor) आणि रकुल प्रीत (Rakul Preet Singh) देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Published by: Priya Lad
First published: December 24, 2020, 7:07 PM IST

ताज्या बातम्या