मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Anupamaa' सोडण्याच्या तयारीत सुधांशू पांडे? हाती लागला मोठा प्रोजेक्ट

'Anupamaa' सोडण्याच्या तयारीत सुधांशू पांडे? हाती लागला मोठा प्रोजेक्ट

टीव्हीवरील 'अनुपमा'  (Anupamaa)  या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तसेच यातील कलाकारांनासुद्धा एक नवी ओळख मिळाली आहे. अनुपमामधील वनराज शाहच्या भूमिकेमुळे सुधांशू पांडे अनेकदा चर्चेत असतो. या भूमिकेतून सुधांशू पांडेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 18 नोव्हेंबर-   टीव्हीवरील 'अनुपमा'  (Anupamaa)  या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तसेच यातील कलाकारांनासुद्धा एक नवी ओळख मिळाली आहे. अनुपमामधील वनराज   (Vanraj)   शाहच्या भूमिकेमुळे सुधांशू पांडे अनेकदा चर्चेत असतो. या भूमिकेतून सुधांशू पांडेने   (Sudhanshu Pandey)  स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुधांशू पांडेने केवळ टीव्हीच नाही तर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. परंतु आता सुधांशू पांडे 'अनुपमा' शो सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. हा शो अनेकदा टीआरपी चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर राहतो. पण, आता बातमी अशी आहे की सुधांशू पांडेच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे. ज्यामुळे तो रातोरात 'अनुपमा' सोडू शकतो.

टेली चक्करच्या रिपोर्टनुसार, सुधांशू पांडेला एका वेब सीरिजची ऑफर आली आहे. त्यामुळे तो 'अनुपमा'मध्ये दिसणार नाही. म्हणजेच लवकरच सुधांशू एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. जी एक पॉलिटिकल ड्रामा असणार आहे. या वेबसिरीजमध्ये सुधांशू एका तरुण राजकारण्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.रिपोर्ट्सनुसार, सुधांशू पांडे या नवीन प्रोजेक्टबद्दल खूप खूश आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुनील सिहाग गोरा ही वेब सिरीज बनवत आहेत, जी त्यांच्या 'डे टर्न्स डार्क' या पुस्तकावर आधारित असेल. याचे शूटिंग गंगानगर आणि राजस्थानच्या काही आसपासच्या भागात केले जाणार आहे.

'अनुपमा'मध्ये 'वनराज'ची भूमिका साकारल्यानंतर सुधांशू पांडेची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्याचे चाहतेही त्याला नव्या अवतारात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, अनुपमामधील त्याची अनुपस्थिती शोच्या टीआरपीवर नक्कीच परिणाम करू शकते. एवढेच नाही तर अभिनेत्याचे चाहतेही यामुळे निराश होऊ शकतात.

(हे वाचा:बिग बॉस' फेम सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी; वाचा काय आहे नेमकं प्रकरण )

वेब सीरिजमध्ये सुधांशू एका राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहे जो भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतो आणि त्याला आपल्या गावातील लोकांसाठी काहीतरी करायचे आहे. या कामात त्याच्यासमोर अनेक अडथळेही येतील, ज्यांना तोंड देणे त्याच्यासाठी आव्हान असेल. दुसरीकडे या वेब सीरिजसाठी सुधांशू 'अनुपमा' सोडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, आम्ही तुम्हाला सांगतो की, सुधांशू सध्या शो सोडत नाहीये. शोमध्ये एक नवीन ट्रॅक सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये वनराज काही दिवसांपासून त्याच्या कुटुंबापासून दूर आहे.

First published:

Tags: Entertainment, Tv shows