KBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला!

या महत्त्वाच्या भागात सुधा वर्गिस एकट्या नाहीत. त्यांच्या सोबत कोण आहे ठाऊकेय? 'सुईधागा'चे नायक-नायिका वरुण धवन आणि अनुष्का शर्मा.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2018 04:38 PM IST

KBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला!

मुंबई, 21 सप्टेंबर : 'कौन बनेगा करोडपती'चा शुक्रवारचा भाग हा कर्मवीर असतो. त्यात यावेळी पद्मश्री सुधा वर्गिस यांची उपस्थिती आहे. तळागाळातल्या लोकांसाठी सुधा वर्गिस काम करतात. बिहारमध्ये त्या सायकलवाली दीदी म्हणून ओळखल्या जातात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कार्यांचं कौतुक केलं.

या महत्त्वाच्या भागात सुधा वर्गिस एकट्या नाहीत. त्यांच्या सोबत कोण आहे ठाऊकेय? 'सुईधागा'चे नायक-नायिका वरुण धवन आणि अनुष्का शर्मा. या भागात बिग बी अनुष्का शर्माची खूप प्रेमळ थट्टाही करतात. सुधा वर्गिस स्वत: क्रिकेट पहात नाही. त्यांच्याशी बोलताना, अनुष्कानं सांगितलं माझे पती क्रिकेट खेळतात. त्यामुळे मी क्रिकेट पाहते.

यावर बिग बी म्हणाले, टीव्हीवर जे दिसतं ते आम्ही सगळं पाहतो. अनुष्कानं विराटला दिलेल्या फ्लाइंग किसबद्दलच ते म्हणत होते. तशी त्यांनी अॅक्शनही करून दाखवली.

Loading...

सुईधागा एका गावाची कहाणी आहे. अनुष्का-वरुणसोबत रघुवीर यादवचीही महत्त्वाची भूमिका आहे. सिनेमा येत्या 28 सप्टेंबरला रिलीज होतोय.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा चक्क बोलका पुतळा सिंगापुरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणारे. हा पुतळा संग्रहालयात येणाऱ्या चाहत्यांशी गप्पाही मारणारे. अशा प्रकारचा बोलका पुतळा असणारी अनुष्का बॉलिवूडची पहिलीच अभिनेत्री असेल. सेल्फीसाठी हातात मोबाईल घेतलेल्या लूकमध्ये हा पुतळा तयार करण्यात येणार असून सेल्फीसाठी जवळ येणाऱ्या चाहत्यांशी तो संवाद साधेल.

Birthday Special : सैफच्या आधी करिना 'या' खानवर झाली होती फिदा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...