मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /तेल-शॅम्पूच्या जाहिरातीमुळं पत्रकार अनुष्का शर्मा झाली अभिनेत्री

तेल-शॅम्पूच्या जाहिरातीमुळं पत्रकार अनुष्का शर्मा झाली अभिनेत्री

तेल-शॅम्पूच्या जाहिरातीतून सुरु केलं होतं करिअर; पाहा पत्रकार अनुष्का शर्मा कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री?

तेल-शॅम्पूच्या जाहिरातीतून सुरु केलं होतं करिअर; पाहा पत्रकार अनुष्का शर्मा कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री?

तेल-शॅम्पूच्या जाहिरातीतून सुरु केलं होतं करिअर; पाहा पत्रकार अनुष्का शर्मा कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री?

मुंबई 1 मे: अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. पि.के., सुलतान, रबने बना दी जोडी यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या अनुष्कानं अगदी कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं वेगळं स्थान प्रस्थापित केलं. आज अनुष्काचा वाढदिवस आहे. 33व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Success story of Anushka Sharma) तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल खरं तर अनुष्काला पत्रकार व्हायचं होतं. तिला अभिनयात फारसा रस नव्हता परंतु तेलाच्या त्या एका जाहिरामुळं तिचं ध्येयच बदललं. पाहूया अनुष्काच्या करिअरमध्ये आलेला तो अनोखा ट्विस्ट...

अनुष्काचा जन्म 1988 साली उत्तर प्रदेशमधील एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. तिचे वडील भारतीय सैन्यात होते. तिच्या घरात शिक्षणाचं वातावरण होतं. त्यामुळं तिचं लक्ष चित्रपटांऐवजी शिक्षणाकडे अधिक होतं. तिला देशातील सर्वोत्कृष्ट पत्रकार व्हायचं होतं. त्यासाठी ती मुंबईत आली होती. मुंबईत शिक्षण घेत असताना मॉडलिंग क्षेत्रातील काही मुलींशी तिची मैत्री झाली. त्यांनी तिला देखील मॉडलिंग करण्याचा सल्ला दिला.

'चित्रपटात किसिंग सीन करणार नाही...!' नेहाचं बोल्ड दृश्यांवर निर्भीड भाष्य

सुरुवातीला मजा म्हणून अनुष्कानं मॉडलिंग केलं. पण त्याच दरम्यान तिला एका तेलाची जाहिरात करण्याची ऑफर मिळाली होती. जाहिरातीमधून थोडीफार प्रसिद्धी मिळेल म्हणून तिनं ही जाहिरात केली. त्यांतर साबण, शॅम्पू, मसाले अशा विविध प्रकारच्या जाहिराती करण्याची संधी तिला मिळाली. याच दरम्यान तिच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली. अन् तिनं विविध ठिकाणी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. 2008 साली रब ने बना दी जोडी या चित्रपटातून तिनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर बदमाश कंपनी, बँड बाजा बारात, पीके, बॉम्बे वेल्वेट यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. सध्या ती चित्रपटांची निर्मिती देखील करत आहे.

First published:
top videos

    Tags: Anushka sharma, Bollywood actress, Entertainment