मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुबोध भावे दिसणार रोमँटिक अंदाजात! वाढदिवसादिवशीच 'फुलराणी'चं फर्स्ट मोशन पोस्टर झालं रिलीज

सुबोध भावे दिसणार रोमँटिक अंदाजात! वाढदिवसादिवशीच 'फुलराणी'चं फर्स्ट मोशन पोस्टर झालं रिलीज

पुन्हा एकदा सुबोध काहीसं आगळंवेगळं घेऊन आपल्या भेटीला येत आहे. 'फुलराणी'  (Phulrani)  चित्रपटातून सुबोध लवकरच एका खास रूपात दिसणार आहे.

पुन्हा एकदा सुबोध काहीसं आगळंवेगळं घेऊन आपल्या भेटीला येत आहे. 'फुलराणी' (Phulrani) चित्रपटातून सुबोध लवकरच एका खास रूपात दिसणार आहे.

पुन्हा एकदा सुबोध काहीसं आगळंवेगळं घेऊन आपल्या भेटीला येत आहे. 'फुलराणी' (Phulrani) चित्रपटातून सुबोध लवकरच एका खास रूपात दिसणार आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 9 नोव्हेंबर-   मराठमोळा अभिनेता सुबोध भावे  (Subodh Bhave)  एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. सुबोधनं विविध धाटणीच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे. त्याची प्रत्येक भूमिका एक वेगळा अनुभव देऊन जाते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा सुबोध असंच काहीसं आगळंवेगळं घेऊन आपल्या भेटीला येत आहे. 'फुलराणी'  (Phulrani)  चित्रपटातून सुबोध लवकरच एका खास रूपात दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचं मोशन पोस्टर  (Motion Poster Release)  रिलीज झालं आहे. अभिनेत्याने आपल्या सोशल मीडियावरून याबद्दलची माहिती देत एक खास पोस्टही लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

अभिनेता सुबोध भावेनं नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. हे पोस्टर त्याचा आगामी चित्रपट 'फुलराणी'च आहे. सुबोध लवकरच या चित्रपटातून आपल्या भेटीला येत आहे. हा चित्रपट फारच खास असणार आहे. यामध्ये अभिनेत्याची भूमिका थोडी विशेष आणि वेगळी आहे. याबद्दलचं सुबोध भावेनं आपल्या पोस्टमधून सप्ष्टीकर दिलं आहे, सुबोधनं आपलं पहिलं मोशन पोस्टर शेअर करत लिहिलं आहे. " फुलराणी' ह्या माझ्या नवीन चित्रपटामध्ये आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न करतोय. तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या! कोरोनाचे सर्व नियम पाळून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे खूप समाधान आहे. 2022 मध्ये आधी चित्रपटगृहांत आणि मग बाकी माध्यमांतून 'फुलराणी' प्रदर्शित करायचा मानस निर्मात्यांनी आणि फुलराणीच्या सर्व टीमने केला आहे.फुलराणीचे पहिले motion poster खास तुमच्यासाठी!"

या पोस्टरमध्ये सुबोध भावे अगदी रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. सुबोध यामध्ये अभिनेत्रीसोबत डान्सिंग पोजमध्ये आहे. मात्र अभिनेत्री यामध्ये पाठमोरी उभी आहे तिचा चेहरा दिसत नाहीय. विश्वास जोशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर हर्षवर्धन साबळे, जय जोशी आणि अमृता राव हे चित्रपटाचे निर्माते आहेत. २०२२ मध्ये हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत. पोस्टर पाहून चाहते उत्सुक झाले आहेत. खासकरून सुबोधला रोमान्स करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अभिनेता सुबोध भावे मराठीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. तो सतत आपल्या चित्रपटातून निरनिराळे विषय मांडत असतो. त्यातून तो विविध संदेशसुद्धा पोहोचवत असतो. त्यामुळे अभिनेत्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटातून एक अभ्यासूवृत्ती दिसून येते. अभिनेत्याने फक्त चित्रपटच नव्हे तर छोटा पडदा आणि रंगमंचसुद्धा गाजवला आहे. त्याने अनेक सुंदर मालिकासुद्धा केल्या आहेत. काही काळापूर्वी आलेली 'तुला पाहते रे' हि त्याची मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्याच टायटल सॉन्गसुद्धा फारच पसन्त केलं गेलं होतं. त्यांनतर आलेली 'चंद्र आहे साक्षीला'ही मालिकासुद्धा विशेष गाजली होती.

First published:

Tags: Marathi entertainment