'तुला पाहते रे' मालिका देणार एक मोठा धक्का

'तुला पाहते रे' मालिका देणार एक मोठा धक्का

तुला पाहते रे मालिकेत बरेच दिवस गायब असलेला सुबोध भावे परततोय. प्रेक्षकांना ही मालिका आणखी एक धक्का देणार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून : बरेच दिवस 'तुला पाहते रे' मालिकेत सुबोध भावे दिसत नाहीय. विक्रांत सरंजामेला लंडनला पाठवलंय. सगळी चक्र ईशाभोवतीच फिरतायत. सुबोधच्या 'अश्रूंची झाली फुले' नाटकामुळे तो शूटिंगसाठी डेट्स देऊ शकत नव्हता. शिवाय कथेतही राजनंदिनीचा जन्म, पुनर्जन्म अशी वळणं आणली गेली. ईशाची भूमिका करणाऱ्या गायत्रीच्या अभिनयातही झालेली चांगली प्रगती प्रेक्षकांना जाणवली.

आता मात्र विक्रांत सरंजामे लंडनहून परत येतोय. खुद्द सुबोध भावेनंही फेसबुकवर ' तो येतोय लवकरच' अशी पोस्ट टाकलीय. सध्या मालिकेत सुबोध नसला तरी बऱ्याच घडामोडी घडत आहेत. ईशा राजनंदिनीला त्रास देणाऱ्यांना धडा शिकवायला सरसावलीय.

अभिनेत्री ईशा देओल दुसऱ्यांदा झाली आई, मुलीचं नाव ठेवलं...

बाथरूममध्ये पडून चाहत्याचा अपघाती मृत्यू, बातमी ऐकून रणवीर झाला भावुक

झेंडेंना ईशा हा राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचं कळलंय. ते प्रचंड घाबरतात. विक्रांतही लंडनहून परत येतो आणि झेंडे विक्रांतला ईशा हीच राजनंदिनी असल्याचं सांगतात. ईशावर टाकत असलेला डाव आपल्यावरच उलटलाय, असं ते सांगतात. अर्थात, विक्रांतला हे पटत नाहीय.

‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला कॉपी केल्यानं मलायका अरोरा होतेय ट्रोल

आता काही दिवसांत सुबोध भावेची मालिकेत एंट्री होतेय. मालिकेत ईशा आणि विक्रांत यांची टशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. विक्रांतला बेसावध ठेवून ईशा तिचा हिशेब चुकता करणार.  ईशा राजनंदिनी असल्याचं आईसाहेबांनाही पटलंय. जयदीपही ईशाची साथ देतोय.

सुबोधनं मालिकेत नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका चांगल्या साकारल्या. बरेच दिवस ईशा आणि विक्रांतच्या गोड प्रेमाचा ओव्हरडोस झाला होता. आता विक्रांतचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला. इतकंच काय तर विक्रांतचं खरं नाव गजा पाटील असल्याचंही उघड झालंय.

सुमित राघवनच्या संतापानंतर मनपाच्या हालचाली, नाट्यगृहात जॅमर बसवणार?

First published: June 11, 2019, 2:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading