शरद पवारांच्या भूमिकेत सुबोध दिसणार? बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा

शरद पवारांच्या भूमिकेत सुबोध दिसणार? बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा

काही दिवसांपूर्वी सुबोधने शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी : मराठी चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम भूमिका बजावणारा आणि बायोपिकचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा नट म्हणजे सुबोध भावे. सुबोध भावेने अनेक बायोपिकमध्ये उत्तम भूमिका बजावल्या आहेत. नुकतंच सुबोधने डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या बायोपिकमध्ये काम केलं. आणि प्रेक्षकांनी सुबोध भावेंच्या या भूमिकेला प्रचंड पसंती दिली.

त्यातच सुबोध भावेने पुन्हा एकदा शरद पवारांच्या बायोपिकमध्ये काम कऱण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी सुबोधने शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आता पुन्हा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुबोधने पुन्हा शरद पवारांच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असं म्हटलं आहे. सुबोध म्हणाला की, 'बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणेच शरद पवारांच्या व्यक्तीमत्वाने मला नेहमीच भुरळ घातली. भविष्यात जर मला शरद पवारांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. सातत्याने व्यक्त होणाऱ्यांपेक्षा एक नेता जोयोग्य ठिकाणीच व्यक्त होतो.’

सुबोधने याआधीही ही इच्छा व्यक्ती केली होती. सुबोध म्हणाला होता की, ‘आपल्या मनात काय चाललयं हे कुणालच कळू न देता पवार इतके वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी जेवढं बघितलं तेवढं कुणीही बघितलेलं नाही.’ सुबोधने वेळोवेळी शरद पवारांप्रतीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची सुबोधची दाट इच्छा असल्याचं दिसून येत आहे.

First published: February 20, 2020, 4:10 PM IST

ताज्या बातम्या