'काशिनाथ घाणेकर' सिनेमात सुमित राघवननं पेललंय हे शिवधनुष्य!

'काशिनाथ घाणेकर' सिनेमात सुमित राघवननं पेललंय हे शिवधनुष्य!

सिनेमात सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन यांच्याही भूमिका असल्याची माहिती होती. पण आता सुमित राघवन कुठली भूमिका साकारतोय हे समोर आलंय.

  • Share this:

मुंबई, 4 सप्टेंबर : सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीत चर्चा आहे ती काशिनाथ घाणेकर या सिनेमाची. सुबोध भावेचं काशिनाथ घाणेकर साकारतोय. सिनेमात सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन यांच्याही भूमिका असल्याची माहिती होती. पण आता सुमित राघवन कुठली भूमिका साकारतोय हे समोर आलंय. सुबोध भावेनं स्वत:च्या फेसबुक पेजवर ते पोस्ट केलंय.

सुमित सिनेमात श्रीराम लागूंची भूमिका साकारतोय. चष्म्यातून त्याचे शांत पण भेदक असे डोळे दिसतायत. सुमितसाठी हे एक मोठं आव्हानच होतं. तो म्हणतो, ' शूटिंगच्या आधी मला डाॅ. लागूंचे आशीर्वाद लाभले होते. त्यांची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्यच आहे. मला नक्कल करायची नव्हती.'

सिनेमात 1960चा काळ जिवंत केलाय. काशिनाथ घाणेकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यु, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी अशी अजरामर नाटकं गाजवली. हे सगळं आपल्याला सुबोध भावेच्या रूपात पाहता येईल. याबद्दल सुबोध म्हणतो, ' माझे आणि त्यांचे विचारही पूर्ण वेगळे आहेत. आमची व्यक्तिमत्त्वही वेगळी आहेत.बालगंधर्व, लोकमान्य साकारताना विचारांशी कुठे तरी साम्य होतं. पण इथे असं काहीच नव्हतं.'

डाॅ. काशिनाथ घाणेकर म्हटलं की अद्वितीय नाटकांचा इतिहासच समोर उभा राहतो. त्यांच्या नुसत्या नावावरच हाऊसफुलचे बोर्ड लागायचे. मराठी रंगभूमीवरचे हे सुपरस्टार आता मोठ्या पडद्यावर भेटायला येणार आहेत.

वायकाॅम18चा हा सिनेमा 7 नोव्हेंबरला रिलीज होतोय. आतापर्यंत मराठीत बालगंधर्व, लोकमान्य टिळक यांच्यावरचे सिनेमे हिट झाले होते. सुबोध भावेनं टिळकांची भूमिका अप्रतिम केली होती. त्यामुळेच आणि काशिनाथ घाणेकर सिनेमाबद्दल अपेक्षा वाढल्यात.

VIDEO: जोधपूरमध्ये भारतीय विमानाला भीषण अपघात

First published: September 4, 2018, 10:58 AM IST

ताज्या बातम्या