मुसळधार पावसामुळे सुबोध भावेचा 3 तास स्टेशनवर खोळंबा, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

मुसळधार पावसामुळे सुबोध भावेचा 3 तास स्टेशनवर खोळंबा, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचा फटका अभिनेता सुबोध भावेलाही बसला.

  • Share this:

मुंबई, 04 ऑगस्ट- मुंबई आणि परिसरात पहाटेपासूनच पावसानं जोर धरला आहे. हवामान खात्याने आज दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे रेड अलर्ट जारी केलं आहे. गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं असून मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेचे तीन- तेरा वाजले. दरम्यान, शनिवार- रविवार असल्यामुळे अनेक नागरिकांनी घरात राहणंच पसंत केलं. पण, असेही काही नागरिक होते ज्यांना कामानिमित्त घराबाहेर पडावं आणि पावसाच्या तडाख्यात ते अडकले. अभिनेता सुबोध भावेही सध्या या पावसाच्या तडाख्यात अडकला.

त्याचं झालं असं की सुबोध विदर्भ एक्स्प्रेसमधून मुंबईत येत होता. मात्र पावसामुळे ही ट्रेन खोळंबली. अखेर त्याला टॅक्सी करून मुंबई गाठावी लागली. दरम्यान त्याने ट्वीट करून त्याच्या चाहत्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज दिला आहे. सुबोधने ट्वीट करत म्हटलं की, 'विदर्भ एक्सप्रेस नी मुंबई मध्ये येताना वाशिंद स्थानकावर गेली ३ तास अडकलो आहे.आत्ता टॅक्सी करून निघालो.पण मित्रांनो गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नका.स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या.'

दरम्यान, आज ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने या 6 जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या ठिकाणी 204 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. यासोबतच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या ठिकाणी 65 ते 200 मिमीच्या दरम्यान पाऊस पडू शकतो. महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. यासह धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, सांगली, सोलापूरात पुढचे 4 दिवस हलक्या सरी बरसतील. तसंच संपूर्ण मराठवाड्यातही 4 दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील.

या बॉलिवूड अभिनेत्रीने पतीवर केला अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा आरोप

रणवीर सिंगचा शर्टलेस फोटो पाहून हा कॉमेडियन म्हणाला- जब लगावे तू लिपिस्टिक...

पैशांसाठी काहीही कराल का, नेटीझन्स भडकले

VIDEO: मालाडमध्ये घरात गुडघ्याभर पाणी, नागरिकांचे हाल

Published by: Madhura Nerurkar
First published: August 4, 2019, 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading