सुबोध भावेच्या 'सविता दामोदर परांजपे'चा फर्स्ट लूक पाहिलात का?

सुबोध भावेच्या 'सविता दामोदर परांजपे'चा फर्स्ट लूक पाहिलात का?

सविता दामोदर परांजपे. मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाटक. आणि आता हे नाटक सिनेमाच्या रूपात येतंय. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल यांच्या मुख्य भूमिका आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : सविता दामोदर परांजपे. मराठी रंगभूमीवर गाजलेलं नाटक. आणि आता हे नाटक सिनेमाच्या रूपात येतंय. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल यांच्या मुख्य भूमिका आहे. सिनेमाची निर्मिती केलीय जाॅन अब्राहमनं, तर स्वप्ना वाघमारे जोशीनं दिग्दर्शन केलंय. सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केलाय. या गाजलेल्या नाटकावरच्या सिनेमात काम करायला मिळतंय, याबद्दल सुबोध भावेनं स्वत:ला नशीबवान म्हटलंय. तर सविता दामोदर परांजपे ही अजरामर भूमिका रीमा लागूंनी केली होती. सिनेमात या भूमिकेचं आव्हान पेलताना छान वाटलं, असं तृप्ती सांगते. दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी म्हणतात, बरेच दिवस या नाटकावर सिनेमा करायचं डोक्यात होतं. जाॅन अब्राहमची साथ मिळाली, मग अजून काय हवं?

सविता दामोदर परांजपे नाटक सुकन्या कुलकर्णी आणि संजय मोने यांनीही साकारलं होतं. आता प्रोमोवरून जाणवतं की हे नाटक सिनेमात जसंच्या तसं उचललं नाहीय. त्याचं वेगळं रूप दिसून येतं.

'गेल्या अनेक वर्षात मराठीत दर्जेदार सिनेमे येतात. मला या सिनेमाची निर्मिती करायला मिळाली, हे माझं भाग्यच आहे,' असं जाॅन सांगतो. हल्ली अनेक बाॅलिवूड कलाकारांनी मराठीकडे मोहरा वळवलाय. रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, अजय देवगण, माधुरी दीक्षित, अक्षय कुमार असे अनेक जण मराठी सिनेमे करतायत. आणि त्यांना यशही मिळतंय

सुबोध भावे सध्या भलताच बिझी आहे. एकाच वेळी त्याच्या बऱ्याच कलाकृती समोर येतायत. त्याची निर्मिती असलेला पुष्पक विमान, त्याची सीरियल आणि 31 आॅगस्टला रिलीज होणारा सविता दामोदर परांजपे हा सिनेमा. अशा पद्धतीनं सुबोधच्या फॅन्ससाठी ही चांगली ट्रीट आहे.

First published: July 26, 2018, 11:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading