सुबोध भावे नाटकात काम करणार नाही? या कारणानं संताप अनावर

सुबोध भावे नाटकात काम करणार नाही? या कारणानं संताप अनावर

'तुला पाहते रे' ही सुबोध भावेची मालिका नुकतीच संपली यातील त्यानं साकरलेली विक्रांत सरंजामे ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : नाटक महाराष्ट्राची समृद्ध परंपरा. नाटक पाहण्याकरता रसिक येतात असं म्हटलं जातं. पण त्यातील काही जण कलाकारांसाठी उपद्रवी ठरत आहेत. नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याकारणानं अनेक कलाकारांनी आजवर अनेकदा रोष व्यक्त केला. आता त्यात अभिनेता सुबोध भावेचीही भर पडली आहे. सुबोध भावेचं 'अश्रूंची झाली फुले' हे नाटक सुरु असताना मोबाईल वाजल्यानं या प्रकारावर सुबोधनं आपली नाराजी व्यक्त केली. यावरील उपाय म्हणजे नाटकात काम न करणे असं म्हणत सुबोध भावेंनी सोशल मीडियावरून उपहासात्मक टीका केली आहे.

सुबोधनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, 'अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच या पुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोन च्या मध्ये आमची लुडबुड नको.कारण फोन जास्त महत्त्वाचा. नाटक काय टीव्ही वर पण बघता येईल.' सुबोध वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला पाहायला मिळाल्या. अनेकांनी याबाबत सुबोधला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

कार्तिक आर्यनसोबत बाइकवर बसण्यासाठी सारा अली खान घेते पैसे? VIDEO VIRAL

याबाबत न्यूज 18 लोकमतशी बोलताना सुबोध म्हणाला, 'एका क्षणाला वाटलं की, नाटकात कामच करु नये, पण तो आमचा श्वास आहे. त्यामुळे एवढ्याश्या गोष्टी हार मानणं योग्य नाही. याशिवाय अनेक डॉक्टर किंवा अशी मंडळी नाटकाला येतात. ज्यांच्या घरी वृद्ध माणसं आहेत. मग अशा लोकांना त्यांच्या फोन कॉल्सना उत्तर देणं खरंच गरजेचं असतं. टीव्ही मालिका किंवा सिनेमामध्ये प्रेक्षक आणि कलाकार एकत्र नसतात मात्र नाटकाचं तसं नसतं. त्यामुळे मी माझ्या पुढच्या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी एक अनोखा उपाय करणार आहे. जो तुम्हाला त्यावेळीच कळेल.'

मुहूर्त ठरला? मलायकाच्या आई-बाबांना भेटायला मध्यरात्री घरी पोहोचला अर्जुन कपूर

'तुला पाहते रे' ही सुबोध भावेची मालिका नुकतीच संपली यातील त्यानं साकरलेली विक्रांत सरंजामे ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. या मालिकेतून बऱ्याच वर्षांनंतर सुबोधनं छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा तो रंगमंचाकडे वळला आहे.

हिरोला 442 रुपयांना 2 केळी देणं भोवलं, हॉटेलला इतक्या हजारोंचा फटका

===============================================================

'...यावर एकच उपाय नाटकात काम न करणं', का भडकला सुबोध भावे? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 09:26 AM IST

ताज्या बातम्या