मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Subodh bhave : सुबोध भावे साकारणार 'धर्माभिमानी हिंदूची' भूमिका; नवीन माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Subodh bhave : सुबोध भावे साकारणार 'धर्माभिमानी हिंदूची' भूमिका; नवीन माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Subodh bhave

Subodh bhave

सुबोध भावे सध्या एकामागोमाग एक प्रोजेक्ट्ची घोषणा करतायत. नुकतीच त्यांनी 'हर हर महादेव' आणि 'निरवधी' या चित्रपटांची घोषणा केली होती. आता ते पुन्हा एकदा नव्या कोऱ्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहेत.

  मुंबई, 22 सप्टेंबर : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोध भावे सध्या एकामागोमाग एक प्रोजेक्ट्ची घोषणा करतायत. नुकतीच त्यांनी 'हर हर महादेव' आणि 'निरवधी' या चित्रपटांची घोषणा केली होती. आता ते पुन्हा एकदा नव्या कोऱ्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहेत. सुबोध भावे सध्या  टीव्ही शो, सिनेमा, वेब सीरिज, अभिनय आणि दिग्दर्शन सगळ्या पातळ्यांवर सुबोध काम करत आहेत. आता ते एका नवीन माध्यमातून भेटीला येणार आहेत. ते म्हणजे शॉर्ट फिल्म. सुबोध लवकरच एका शॉर्ट फिल्म मध्ये दिसणार आहे. सुबोधची 'अंत:करण' ही शाॅर्टफिल्म याच महिन्याच युट्यूबवर रिलीज होणार आहे. त्याबद्दल  त्यानं सोशल मीडियावर माहिती दिली आहे. सुबोधनं लिहिलं आहे, 'एका धर्माभिमानी हिंदूची ही कथा आहे. तो दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या सहकाऱ्यांमध्ये अडकलाय. दोघंही त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतात.' ही शाॅर्टफिल्म २७ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता रिलीज होईल. पाॅकेट फिल्म्सच्या युट्यूब चॅनेलवर ती पाहता येईल.
  या फिल्ममध्ये सुबोधबरोबर अभिनेता सचित पाटील आणि रवी काळे आहेत. अभिषेक गुणाजी आणि संदीप बाणकेश्वर यांनी फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. अभिषेक हा मिलिंद गुणाजीचा मुलगा आहे. सुबोधला  अजून एका नवीन भूमिकेत पाहता येणार म्हणून त्याचे चाहते भलतेच खुश झालेले दिसतायत. त्यांनी सुबोधच्या या पोस्टवर अभिनंदन!! नक्की पाहू!', 'वाह ! खुप आनंदच आनंद',  'आतुरता', 'खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा' अशा कमेंट्स केल्या आहेत. हेही वाचा - Rohan Joshi on Raju Srivastava: राजू श्रीवास्तवांबाबत बोलताना घसरली कॉमेडीयनची जीभ; निधनानंतर केली असभ्य शब्दात टीका सुबोध भावेंच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तो सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे.  झी मराठीवर त्याचा 'बस बाई बस' हा कार्यक्रम सुरु  आहे. तसेच 'मारवा' या एका नवीन चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध करत आहे. त्याचबरोबर सुबोध भावेची निर्मिती संस्था लवकरच 'कालसूत्र - प्रथम द्वार | मृत्यूदाता' ही  नवीन वेब सिरीज घेऊन येणार आहे. त्यासोबतच महेश मांजरेकरांच्या 'निरवधी' या चित्रपटातसुद्धा सुबोध झळकणार आहे. तसेच येणाऱ्या काळात 'हर हर महादेव' या चित्रपटात सुबोध छत्रपती शिवाजी महारांजांच्या भूमिकेत झळकणार आहे.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या