मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Subodh Bhave : 'आज 'मुरलीधराचा' सण आणि...' सुबोधला मिळाले खास आशीर्वाद; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Subodh Bhave : 'आज 'मुरलीधराचा' सण आणि...' सुबोधला मिळाले खास आशीर्वाद; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Subodh Bhave

Subodh Bhave

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' निमित्त सुबोधला खूप छान आशीर्वाद मिळाले आहेत. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करत आहे. हा कार्यक्रम सध्या सगळीकडे लोकप्रिय ठरत आहे. सुबोध भावे सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय आहे. तो वेगवगेळ्या पोस्ट सोशल मीडियावरून शेअर करत असतो. चाहत्यांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. नुकतंच 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' निमित्त सुबोधला खूप छान आशीर्वाद मिळाले आहेत. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. सुबोधला आज जन्माष्टमी निमित्त एक छान आशीर्वाद मिळाला आहे.  त्याला आज "पंडित हरिप्रसाद चौरसिया" यांचे आशीर्वाद मिळाले आहेत. त्याने फोटो शेअर करत लिहिलं आहे कि, ''आज 'मुरलीधराचा' सण आणि त्याच मुरलीला (बासरी) ज्यांनी जागतिक स्तरावर नेलं त्या "पंडित हरिप्रसाद चौरसिया" यांची भेट.एक अपूर्व योग. त्यांच्या आशिर्वाद हीच एक ऊर्जा. हरिजी' अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे जेष्ठ बासरीवादक आहेत. आज 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' दिवशी सुबोधला त्यांचे आशीर्वाद मिळाले आहेत.
चाहत्यांनी सुबोधच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 'हे मौल्यवान क्षण जपून ठेवण्या सारखेच आहेत हि ऊर्जा हा आशिर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहतो...','अविस्मरणीय क्षण आणि अपूर्व योग!' अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा - Satvya mulichi satavi mulagi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत 'हे' कलाकार साकारणार महत्वपूर्ण भूमिका सुबोध भावे सध्या बराच चर्चेत आहे. मध्यंतरी त्याने सरकारबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला होता.  'लायकी नसलेल्या राजकाऱ्यांच्या हातात देश उभारणीचं काम दिलं आहे', असं बेधडक वक्तव्य त्याने केलं होतं. नंतर त्याने याचं स्पष्टीकरण देणारी पोस्ट केली होती. सुबोध भावेंच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तो सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. येत्या काळात झी मराठीवर त्याचा 'बस बाई बस' हा कार्यक्रम सुरु झाला आहे. तसेच 'मारवा' या एका नवीन चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध करत आहे. त्याचबरोबर सुबोध भावेची निर्मिती संस्था लवकरच एक नवीन वेब सिरीज घेऊन येणार आहे.
First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment

पुढील बातम्या