S M L

सुबोध भावेसोबत काम करणारी ही नवी अभिनेत्री आहे कोण?

ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची ही कथा आहे. त्यात विक्रम हा मोठ्या वयाचा दाखवलाय.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2018 11:59 AM IST

सुबोध भावेसोबत काम करणारी ही नवी अभिनेत्री आहे कोण?

मुंबई, 06 आॅगस्ट : सध्या टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एकच चर्चा सुरू आहे. सुबोध भावेसोबत मालिकेत झळकणारी ही अभिनेत्री आहे कोण? एक तर ती पहिल्यांदाच समोर येतेय. प्रोमोमध्ये तू एकदम गोजिरी दिसतेच आहे, पण आपल्या मतांवर ठामही आहे. ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची ही कथा आहे. त्यात विक्रम हा मोठ्या वयाचा दाखवलाय. सुबोध भावेसारख्या दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करायला संधी मिळणारी ही अभिनेत्री आहे कोण, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.

तर ही आहे गायत्री दातार. 'तुला पाहते रे' मालिकेतू तिचं पहिल्यांदाच पदार्पण होतंय. गायत्री सांगते, ' ती ईशा निमकर नावाच्या मुलीची भूमिका साकारतेय. ही मुलगी फार हुशार नाही आणि फार ढसुद्धा नाही. तिचे वडील एकदम साधे आणि देवभोळे आहेत. ती तिच्या वडिलांच्या एकदम जवळ आहे.'

ती म्हणते, ' मी सुबोध भावेसोबत काम करतेय, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायला मिळणं ही तुमच्या करियरसाठी सकारात्मक गोष्ट आहे.'सेटवर सध्या जोरदार शूटिंग सुरू आहे. गायत्री सांगते, 'सेटवर वातावरण एकदम चांगलं असतं. डीओपी असोत, दिग्दर्शक असोत, मला संयम ठेवून समजवून सांगतात. नुकताच माझा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी शूट नव्हतं. पण नंतर जेव्हा शूट होतं, तेव्हा सेटवर वाढदिवस साजरा झाला.

गायत्रीनं इंजिनियरिंग केलंय. अभिनयाची आवड होतीच काॅलेजच्या नाटकांमध्ये काम केलं होतंच. पण इथे आॅडिशन्स देऊनच ती मालिकेत आली. गायत्री अवधूत गुप्तेसोबतही एका सिनेमात काम करणार आहे. पण 'तुला पाहते रे' ही तिची पहिलीच मालिका. आता प्रेक्षकही तिला पाहतील आणि मग अभिनयाची पारख करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 11:59 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close