सुबोध भावेचा 'लाल्या' आता रंगमंचावर अवतरणार

सुबोध भावेचा 'लाल्या' आता रंगमंचावर अवतरणार

काशिनाथ घाणेकरांचं अश्रूंची झाली फुले नाटक पुन्हा रंगमंचावर येतंय. सुबोधनं फेसबुकवर ही माहिती दिलीय.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : अभिनेता सुबोध भावेचा 'आणि काशिनाथ घाणेकर' सिनेमा सुपडुपर हिट झाला होता. सुबोधनं साकारलेले अभिनेते काशिनाथ घाणेकर अनेक प्रेक्षकांना आवडले होते. त्या सिनेमातून घाणेकरांच्या नाटक, सिनेमातल्या व्यक्तिरेखा सुबोधच्या रूपानं पाहायला मिळाल्या होत्या.

आता रसिकांसाठी आणखी एक खुशखबर. काशिनाथ घाणेकरांचं अश्रूंची झाली फुले नाटक पुन्हा रंगमंचावर येतंय. सुबोधनं फेसबुकवर ही माहिती दिलीय.

या नाटकाचं दिग्दर्शन करतायत प्रतिमा कुलकर्णी. शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप यांच्याही त्यात भूमिका आहेत. सुबोधनं साकारलेल्या लाल्याचा आवाज घुमणार आहे. ' आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय...' अशीच जाहिरात नाटकाची केलीय. महत्त्वाचं म्हणजे या नाटकाचे फक्त 51 प्रयोग होणार असल्याचं म्हटलंय.

1966मध्ये प्रभाकर पणशीकरांनी हे नाटक पहिल्यांदा रंगमंचावर आणलं होतं. त्यानंतर त्याचे 1111 प्रयोग केले होते. काही वर्षांपूर्वी पुन्हा हे अजरामर नाटक रंगमंचावर आलं. त्यावेळी रमेश भाटकरांनी लाल्याची भूमिका केली होती.

आणि काशिनाथ घाणेकर सिनेमानं जुना काळ जिवंत केला होता. सुबोध या सिनेमाबद्दल म्हणतो, 'काशिनाथ घाणेकर साकारणं सोपं नव्हतं. माझे आणि त्यांचे विचारही पूर्ण वेगळे आहेत. आमची व्यक्तिमत्त्वही वेगळी आहेत.बालगंधर्व, लोकमान्य साकारताना विचारांशी कुठे तरी साम्य होतं. पण इथे असं काहीच नव्हतं.' सुबोध म्हणतो, 'बघ ना, नुसत्या त्यांच्या नावावर नाटक हाऊसफुल होत होतं. मला असा अनुभव कधीच आलेला नाही.' अर्थात, सुबोध सगळं श्रेय दिग्दर्शक अभिजीत देशपांडेला देतो. त्यानं सिनेमा चांगला लिहिलाय.

बऱ्याच वर्षांनी सुबोध भावे नाटक करतोय.

VIDEO: गुढीपाडव्याच्या आर्चीनं दिल्या 'अशा' शुभेच्छा

First published: April 6, 2019, 4:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading