S M L

सुबोध भावेच्या आयुष्यात आणखी किती योगायोग?

सुबोध भावेच्या आयुष्यात योगायोगही खूप आहेत. नुकतंच त्याने फेसबुकवर काशिनाथ घाणेकर भूमिकेचा एक योगायोग पोस्ट केलाय.

Updated On: Sep 9, 2018 01:50 PM IST

सुबोध भावेच्या आयुष्यात आणखी किती योगायोग?

मुंबई, 9 सप्टेंबर : सुबोध भावे सध्या एकदम नंबर वनच्या पोजिशनमध्ये आहे. सिनेमे, मालिका, अभिनय, प्राॅडक्शन सगळीकडेच त्याचा संचार सुरू आहे. नुकताच त्याचा सविता दामोदर परांजपे  सिनेमा अमेरिकेतही रिलीज झालाय. तर तुला पाहते रे मालिका आता सुरू होऊनही तिनं सगळ्या मालिकांना मागे टाकलंय. आणि आता सगळे वाट पाहतायत ती त्याच्या 'आणि काशिनाथ घाणेकर' सिनेमाची.

सुबोध भावेच्या आयुष्यात योगायोगही खूप आहेत. नुकतंच त्याने फेसबुकवर काशिनाथ घाणेकर भूमिकेचा एक योगायोग पोस्ट केलाय. काही वर्षांपूर्वी सुबोध भावेनं झी टाॅकीजसाठी एक फोटो शूट केलं होतं. झी टाॅकीजनं ज्येष्ठ कलाकारांना मानवंदना देण्यासाठी ते शूट केलं होतं . आणि त्यात सुबोध बनला होता काशिनाथ घाणेकर. आता इतक्या वर्षांनी तीच भूमिका त्याच्या वाट्याला आलीय.

काशिनाथ घाणेकर सिनेमात सिनेमात 1960चा काळ जिवंत केलाय. काशिनाथ घाणेकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यु, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी अशी अजरामर नाटकं गाजवली. हे सगळं आपल्याला सुबोध भावेच्या रूपात पाहता येईल.

काही दिवसांपूर्वी आणखी एक योगायोग सुबोधनं पोस्ट केला होता. 'तुला पाहते रे'ची नायिका गायत्री म्हणजेच ईशा सेटवर आली होती. तिनं सुबोधला त्याच्या बरोबर काम करायची इच्छा व्यक्त केली होती. आणि आज ती त्याची नायिका आहे.

Loading...
Loading...

सुबोधच्या विक्रांत सरंजामेची ईशाला असलेली पसंती पाहून आजूबाजूची माणसं शाॅकमध्ये जाणार आहेत. एक श्रीमंत माणूस मध्यमवर्गातल्या ईशाची निवड कशी आणि का करतोय, हाच प्रश्न सगळ्यांना पडणार आहे.

PHOTOS : पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ट्विंकलनं रणवीरचा घेतला किस, सगळे बघत राहिले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2018 01:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close