नवी दिल्ली, ०५ एप्रिल- गेल्या वर्षाच्या सुरुवातीला हॉलिवूड स्टार विल स्मिथ भारतात आला होता. त्याने हरिद्वारमध्ये पूजा केली. हेच नाही तर त्याने रिक्षामधूनही प्रवास केला. विलने रणवीर सिंगसोबत खूप काळ घालवला. या सगळ्यात विल स्मिथच्या डान्सची सर्वत्र चर्चा होती. नुकताच या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
पुनीत मल्होत्राचा सिनेमा 'स्टुडंट ऑफ दि इअर २' मध्ये हा डान्स दाखवण्यात येणार आहे. 'एसओटीव्हाय २' च्या टीमने आलिया भट्टच्या 'राधा' व्हर्जनला विल आणि सिनेमाच्या कास्टसाठी रीक्रिएट केलं आहे.
विलने आपल्या बकेट लिस्टमधला एक एपिसोड सोशल मीडियावर नुकताच शेअर केला. यात त्याने भारतावरचं त्याचं प्रेम व्यक्त केलं. भारत दौऱ्यादरम्यान विलने टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडेसोबत एक स्पेशल सीक्वन्स शूट केलं. नुकताच त्याचा फर्स्ट लुक समोर आला आहे.
आपल्या फेसबुक पेजवर विलने एपिसोड शेअर केला. यात तो बॉलिवूड कलाकारांसोबत राधा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. श्रीकृष्णाच्या बासरीपासून ते चुनरी स्टेपपर्यंतचे विल स्मिथचं काम या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.