'SOTY 2' मधलं ते चकाचक कॉलेज म्हणजे सेट नव्हे, तर आहे ही सरकारी इन्स्टिट्यूट
SOTY 2 मध्ये दिसत असलेलं ते कॉलेज परदेशात नसून भारतातील एक रिसर्च इन्सिट्यूट आहे. पाहा या कॉलेजचे रील आणि रिअल फोटो...

सध्या सगळीकडेच 'स्टुडंट ऑफ द इयर 2' ची चर्चा सुरु आहे आणि सर्वात जास्त चर्चा आहे ती या सिनेमातील स्वप्नवत भासणाऱ्या कॉलेजची. अशा कॉलेजचे आपण विद्यार्थी असायला हवं असं आता प्रत्येक विद्यार्थ्याला वाटू लागलं आहे.

या सिनेमातील कॉलेजमधील हिरवेगार लॉन, प्रशस्त वर्ग, आकर्षक पॅसेज इ. सर्व गोष्टींनी तरुणाईला आकर्षित केलं आहे. त्यामुळे आता अशा कॉलेजमध्ये आपण एकदातरी जावंच अशी प्रत्येकाची इच्छा असेलचं.

पण सिनेमाच्या प्रॉडक्शन डिझायनर सुमय्या शेख यांनी या कॉलेजविषयी नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे. जे ऐकल्यावर प्रत्येकालाच आश्चर्य वाटेल.

'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधील हे स्वप्नवत असलेलं कॉलेज हे प्रत्यक्षात कॉलेज नसून डेहराडूनचं फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. मात्र सिनेमाच्या गरजेनुसार या इमारतीचा मेकओव्हर करण्यात आला.

ही कमाल आहे सेट डिझायनर आणि आर्टिस्टची. त्यांनी घेतलेल्या या विशेष मेहनतीमुळे या रिसर्च इन्स्टिट्यूटचं रुपांतर हुबेहुब फॉरेन कॉलेजसारख्या दिसणाऱ्या कॉलेजमध्ये झालं आहे. या इन्स्टिट्यूचा अशाप्रकारे कायापालट केला गेला की हे ठीकाण भारतात आहे असं सांगितलं तरीही कोणाला खरं वाटणार नाही.

'मुंबई दिल्ली दी कुडिया' या गाण्याचा अलिशान सेट. मेकओव्हर आधी आणि नंतरचा लुक

एखाद्या लग्नाच्या सेटप्रमाणे दिसणारा त्याचं गाण्यातील हे दृश्य. या सेटचा आधीचा फोटो पाहिल्यावर लक्षात येतं की, यासाठी सेट डिझायनर्सनी किती मेहनत घेतली असावी.

'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधील 'जवानी साँग'चा सेट आणि सुंदर विद्युत रोषणाई.

सिनेमातील सुंदर कॅफेट एरिया

या सिनेमातील अनन्या पांडेची बेडरूम
First Published: May 10, 2019 08:29 PM IST