'स्टुडंट ऑफ द इअर-2'चं पोस्टर रिलीज, पण अभिनेत्रींचा पत्ता नाही

'स्टुडंट ऑफ द इअर-2'चं पोस्टर रिलीज, पण अभिनेत्रींचा पत्ता नाही

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ 'स्टुडंट ऑफ द इअर-2' या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या याच सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

  • Share this:

20 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ 'स्टुडंट ऑफ द इअर-2' या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या याच सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. करण जोहरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात टायगर श्रॉफसोबत दिशा पटनी किंवा चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे काम करणार असल्याचं सांगितलं जातंय. पण अजून नक्की नाव ठरत नाहीय.

अभिनेत्रीचं नाव जाहीर न करताच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये फक्त टायगर श्रॉफच त्याच्या हटके लूकमध्ये दिसत आहे.  हा सिनेमा 2018मध्ये आपल्या भेटीला येईल असा अंदाज आहे.

पुनित मल्होत्रा दिग्दर्शित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात नव्या कलाकारांचं पदापर्ण होणार असल्यामुळे या सिनेमासंदर्भात प्रेक्षकांमध्ये वेगळीच उत्सुकता आहे.

'स्टुडंट ऑफ द इअर' हा सिनेमाचा पहिला भाग 2012मध्ये आला होता. त्यात सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत होते.

आता या सिनेमाचा दुसरा भाग आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता हे नवे कलाकार प्रेक्षकांना आवडतात का हे बघणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 12:55 PM IST

ताज्या बातम्या