Home /News /entertainment /

NCB च्या रडारवर असलेली Ananya panday याआधीही होती वादात; अशी केली होती सुटका

NCB च्या रडारवर असलेली Ananya panday याआधीही होती वादात; अशी केली होती सुटका

सध्या अभिनेत्री अनन्या पांडे (Aananya Panday)ही खूप चर्चेत आली आहे. ड्रग्ज प्रकरणी नाव समोर आल्याने तिच्या घरावर एनसीबीने गुरुवारी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे.

  मुंबई , 21 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची (Chunky Pandey) मुलगी अभिनेत्री अन्यना पांडेने (Aananya Panday) करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टूडंट्स ऑफ द ईयर 2’ (Student Of The Year 2 ) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसले होते. मात्र अनन्याचा हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी ती एक वादात अडकली होती. अनन्यासोबत एका मुलीने तीच्या शिक्षणाबाबत एक मोठा खुलासा केला होता ज्यामुळे अनन्या चांगलीच चर्चेत आली होती. अनन्याचे कॉलेज अॅडमिशन फेक असल्याचा आरोप या मुलीने केला होता. सिनेमा प्रदर्शित होणार होता आणि त्यातच हा वाद यामुळे अनन्या चांगलेच टेन्शन आले होते. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी अनन्याने सोशल मीडियाचा आधार घेतला होता. अनन्याच्याबाबतीत 2019 मध्ये एका कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चांगलीच चर्चेत आली होती. अनन्याने यूनिवर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेतेलेच नाही असा आरोप तिच्यावर एका मुलीने केला होता. या वादातून बाहेर पडण्यासाठी अनन्याला तिचे वडील चंकी पांडे यांनी मदत केली होती. अशावेळी गप्प बसण्यापेक्षा यातून बाहेर कसे पडायचे यासाठी चंकी पांडे यांनी अनन्याला प्रोत्साहित केले होते. वाचा : Oscar 2022 साठी 'शेरनी' आणि 'सरदार उधम'ला मिळालं नामांकन यानंतर अनन्याने सोशल मीडियाचा आधार घेत भलीमोठी पोस्ट करत हे आरोप खोटे असल्याचा आरोप केला होता. यावेळी अनन्याने काही कागदपत्रे दाखवत शिक्षणाचा पुरावा दिला होता. अनन्याने या कागदपत्रांचा फोटो शेअर करत म्हटले होते की, मला हे करायचे नव्हते मात्र याचा परिणाम माझ्या कुटुंबावर आणि माझ्या मित्रांच्यावर होत आहे. सिनेमाच्या चित्रीकरणामुळे दोनवेळा प्रवेश घेता आला नसल्याचे तिने सांगितले होते. अनन्या पांडेने त्या कॉन्ट्रोव्हर्सीमधून बाहेर पडण्यासाठी उललंल होतं मोठं पाऊल
  अनन्या पांडेने त्या कॉन्ट्रोव्हर्सीमधून बाहेर पडण्यासाठी उललंल होतं मोठं पाऊल
  बॉलिवू़ड पदार्पणाच्यावेळी अनन्याने सांगितले होते की, तिला कॅलिफोर्नियामधील एका यूनिवर्सिटीमध्ये अॅडमिशनची ऑफर आली होती मात्र सिनेमाच्या चित्रीकरणामुळे ही संधी नाकारली होती.अनन्या पांडे चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती दररोज तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहते. अनन्याने ‘पती पत्नी और वो’ आणि ‘खाली पीली’ यासारख्या सिनेमात अभिनयाची कमाल दाखवली आहे. वाचा : छोट्या पडद्यावरील सोज्वळ सुनेचा SuperHot अंदाज; सृष्टीनं केलं Topless फोटोशूट सध्या  अभिनेत्री अनन्या पांडे ही खूप चर्चेत आली आहे. ड्रग्ज प्रकरणी नाव समोर आल्याने  तिच्या घरावर एनसीबीने गुरुवारी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, NCB ला क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडच्या या यंग जनरेशनमधील अभिनेत्रीचेही चॅट आढळून आले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Ananya panday, Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या