मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

20 वर्षाचा मुलगा म्हणतो, सनी लिओनी माझी आई; नक्की आहे तरी काय प्रकरण?

20 वर्षाचा मुलगा म्हणतो, सनी लिओनी माझी आई; नक्की आहे तरी काय प्रकरण?

बिहारमध्ये (Bihar) एका कॉलेज विद्यार्थ्यांच्या युनिव्हर्सिटी परीक्षेच्या अ‍ॅडमिट कार्डवर(Admit Card) आईचं नाव अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) असं  लिहिलं आहे.

बिहारमध्ये (Bihar) एका कॉलेज विद्यार्थ्यांच्या युनिव्हर्सिटी परीक्षेच्या अ‍ॅडमिट कार्डवर(Admit Card) आईचं नाव अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) असं लिहिलं आहे.

बिहारमध्ये (Bihar) एका कॉलेज विद्यार्थ्यांच्या युनिव्हर्सिटी परीक्षेच्या अ‍ॅडमिट कार्डवर(Admit Card) आईचं नाव अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) असं लिहिलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 डिसेंबर : सध्या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट डुप्लिकेट (Duplicate) तयार करणं किंवा खोटी कागदपत्र तयार करणं सोपं झालं आहे. पण एखाद्या विद्यार्थ्याने प्रत्यक्ष युनिव्हर्सिटीच्या परीक्षा (University Examination) प्रवेश पत्रावरच जर काही उपद्व्याप करून ठेवला असेल तर त्याला काय म्हणावं? बिहारमध्ये एका कॉलेज विद्यार्थ्याने हा प्रताप केला आहे. युनिव्हर्सिटीच्या परीक्षेच्या अ‍ॅडमिट कार्डवर (Admit Card) त्याने वडिलांच्या जागी अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) आणि आईच्या जागी अभिनेत्री सनी लिओन (Sunny Leone) हिचं नाव लिहिलं आहे. बिहारमधील एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने विद्यापीठ प्रशासनाची फसवणूक करत हे अ‍ॅडमिट कार्ड तयार केले आहे. येथील बी.ए. दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्याच्या बनावट अ‍ॅडमिट कार्डचा स्क्रीनशॉट (Screenshot)  सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर येथील भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar) बिहार विद्यापीठाच्या(Bhim Rao Ambedkar Bihar University) अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. हे अ‍ॅडमिट कार्ड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कुंदन कुमार असं या विद्यार्थ्यांचं नाव असू शकतं असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून हा प्रकार कोणी केला आहे हे शोधण्याचं काम सुरू आहे. तो बिहारमधील धनराज महतो डिग्री कॉलेजचा(Dhanraj Mahto Degree College) विद्यार्थी आहे. बिहारमधील (Bihar) मिनापूर येथील या कॉलेजमध्ये हा विद्यार्थी बीएच्या दुसऱ्या वर्षांमध्ये शिकत आहे. या अ‍ॅडमिट कार्डवर वडिलांच्या नावासमोर त्याने इम्रान हाश्मी याचे नाव लिहिलेले आढळून आलं आहे. नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडा फरक असला तरीदेखील ते अभिनेता इम्रानचंच नाव असल्याचं लक्षात येत आहे. त्याचबरोबर आईच्या नावाच्या रकान्यात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हिचे नाव लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये पत्ता म्हणून त्या भागातील रेड लाईट एरिया असलेल्या चतुर्भुज स्थानाचे नाव लिहिण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी आम्ही चौकशीचे आदेश दिले असल्याचे विद्यापीठाचे रजिस्ट्रार राम कृष्ण ठाकूर यांनी सांगितले आहे. ही शुद्ध फसवणूक असून या प्रकरणात दोषी असणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणार असल्याचे देखील त्यावेळी त्यांनी स्पष्ट केली. चौकशीनंतर यामध्ये दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. अ‍ॅडमिट कार्डावर छापलेला आधार कार्ड (Aadhar Card) नंबर आणि मोबाइल नंबरच्या सहाय्याने विद्यार्थ्याला शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress