मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /वडील चहा-समोसे विकून चालवायचे घर, वाचा नेहा कक्करचा थक्क करणारा प्रवास

वडील चहा-समोसे विकून चालवायचे घर, वाचा नेहा कक्करचा थक्क करणारा प्रवास

बॉलिवूडमध्ये नेहा कक्कर (Neha Kakkar) हे नाव आजघडीला माहिती नसणारी व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. मात्र, सुरुवातीचे नेहाचे दिवस अत्यंत संघर्षाचे होते.

बॉलिवूडमध्ये नेहा कक्कर (Neha Kakkar) हे नाव आजघडीला माहिती नसणारी व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. मात्र, सुरुवातीचे नेहाचे दिवस अत्यंत संघर्षाचे होते.

बॉलिवूडमध्ये नेहा कक्कर (Neha Kakkar) हे नाव आजघडीला माहिती नसणारी व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. मात्र, सुरुवातीचे नेहाचे दिवस अत्यंत संघर्षाचे होते.

मुंबई 8 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये नेहा कक्कर (Neha Kakkar) हे नाव आजघडीला माहिती नसणारी व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. अफाट जिद्द आणि प्रतिभेच्या बळावर तिनं बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं नाव कमावलं आहे. आजपर्यंतच्या कारकिर्दीत तिनं अनेक सुपरहिट गाणी दिली असून याठिकाणी पोहोचण्यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. अनेक ठिकाणी आपल्या या संघर्षाबद्दल नेहाने सांगितलं आहे. आज आम्ही तुम्हाला तिच्या या संघर्षाच्या प्रवासाविषयी सांगणार आहोत.

नेहा सध्या एका प्रसिद्ध संगीत शोमध्ये जज म्हणून काम करत आहे. बॉलिवूडमधील सध्या प्रचलित आणि हिट असणारी जवळपास अनेक गाणी नेहा कक्कर हिनं गायली आहेत. तिनं प्रसिद्ध सिंगिंग रिऍलिटी शो 'सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स ' (Sa Re Ga Ma Pa Little Champs) या प्रसिद्ध कार्यक्रमात आपल्या या यशाचं श्रेय मोठी बहीण सोनू कक्कर(Sonu Kakkar) हिला दिलं होतं. आपल्या मोठ्या बहिणीमुळंच आपण गायिका होऊ शकल्याचं तिनं म्हटलं होतं. आमच्या घरात कुणीही गायक नव्हतं. सोनू दीदीनं खूप लहान वयात गायनाला सुरुवात केली होती. मीदेखील वयाच्या चौथ्या वर्षापासून गाणं गात आहे. सोनू आणि टोनी (Tony Kakkar) माझे जीवलग असून मी आज जे काही आहे ते सोनू दीदीमुळं असल्याचं नेहा कक्करनं या कार्यक्रमात म्हटलं होतं.

नेहा कक्कर(Neha Kakkar) मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. तिचे वडील बहिणीच्या कॉलेजबाहेर चहा आणि समोसा विकायचे. छोट्या शहरातील असल्यामुळं आमच्यावर खूप बंधनं होती. छोट्या शहरातील लोकांना मोठी स्वप्नं पाहण्याचा देखील अधिकार नसल्याचं नेहानी कार्यक्रमात म्हटलं  होतं. आमची घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं आणि वडील कॉलेजच्या बाहेर चहा विकत असल्यानं सोनू दीदीला मुलं चिडवत असतं. याचबरोबर टोनी कक्करविषयी बोलताना नेहानं तो खूप लहान होता. परंतु आम्हा दोघी बहिणींसाठी तो गाणी लिहीत असे. त्याचं 'मिले हो तुम हमको" (Mile Ho Tum Humko) हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर आम्हाला यश मिळण्यास सुरुवात झाल्याची माहिती नेहानं दिली. यामुळं तिचा संघर्ष खूप मोठा असल्याचं दिसून येत आहे.

सध्या नेहा कक्कर(Neha Kakkar) एक यशस्वी सिंगर असून तिच्याकडं करोडो रुपयांची संपत्ती आहे. स्वप्न पाहू नयेत असं नाही तर ती खरी करण्याची जिद्ददेखील असावी हे नेहा कक्करच्या रूपानं पुढं आलं आहे. अनेकदा सोशल मीडियावर ती आपल्या पतीसह विविध फोटो टाकत आहेत. याचबरोबर सर्वांसमोर आदर्शदेखील निर्माण केला आहे.

First published:

Tags: Neha kakkar