बॉलिवूडमधील आतापर्यंतचं सर्वात बोल्ड गाणं रिलीज, पाहा VIDEO

बॉलिवूडमधील आतापर्यंतचं सर्वात बोल्ड गाणं रिलीज, पाहा VIDEO

हे गाणं बॉलिवूडमधील आतापर्यंतचं सर्वात बोल्ड गाणं मानलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : बॉलिवूडमध्ये सध्या बिग बजेट सिनेमा रिलीज होत आहेत. नव्या वर्षातही रिलीज होणाऱ्या सिनेमांची फार मोठी लिस्ट आहे. यापैकी एक सिनेमा म्हणजे वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा ‘स्ट्रीट डान्सर’. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. त्यानंतर आता या सिनेमातील ‘गर्मी सॉन्ग’ रिलीज झालं आहे. हे गाणं बॉलिवूडमधील आतापर्यंतचं सर्वात बोल्ड गाणं मानलं जात आहे.

गर्मी सॉन्गमध्ये नोरा फतेही आणि वरुण धवन यांच्या किलर डान्स मूव्ह पाहायला मिळत आहे. पण या गाण्यला नोरानं दिलेला बोल्डनेसचा तडका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नोरानं डान्स केलेल्या आतापर्यंतच्या गाण्यांमध्ये हे सर्वाधिक बोल्ड गाणं असल्याचं बोललं जात आहे. या गाण्याच्या सुरुवातीलाच सूचना देण्यात आली आहे. 'सावधान, जो आप देखने जा रहे हैं वो इतना हॉट है कि उसे नजरअंदाज करना मुश्किल है'. यानंतर नोराचा बोल्ड आणि सिजलिंग अवतार या गाण्यात दिसत आहे.

माधुरी दीक्षितच्या ‘कोठी’ची आज होणार विक्री, जाणून घ्या किती आहे किंमत

‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ मधील गर्मी सॉन्ग नेहा कक्कर आणि बादशाह यांनी गायलं आहे. रिलीज झाल्यानंतर काही वेळातच या गाण्याला लाखो व्ह्यूव्ह मिळाले आहेत. त्यामुळे हे गाणं सोशल मीडियावर धमाका करणार यात अजिबात शंका नाही. तसेच या सिनेमातही धमाकेदार डान्स पाहायला मिळाणार आहेत. याआधी या सिनेमातील ‘मुकाबला’ हे गाणंही रिलीज झालं आहे. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

‘बोललो असतो पण, तान्हाजी सिनेमावर बंदी घालतील’

वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ हा सिनेमा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. टी सीरिजची निर्मिती असलेला हा सिनेमा रेमो डिसूझानं दिग्दर्शित केला आहे. याआधीही त्यानं अशाप्रकाचे सिनेमे तयार केले आहेत ज्यात ABCD आणि ABCD-2 या सिनेमांचा समावेश आहे.

सलमान खान यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, कारण...

Published by: Megha Jethe
First published: December 26, 2019, 3:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading