Home /News /entertainment /

Birthday Special: राणी मुखर्जीचा आवाज ठरला होता वादाचा मुद्दा, 'या' सिनेमासाठी डब करावा लागला आवाज

Birthday Special: राणी मुखर्जीचा आवाज ठरला होता वादाचा मुद्दा, 'या' सिनेमासाठी डब करावा लागला आवाज

‘राजा की आएगी बारात’ या सिनेमातून मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत बॉलिवूडमध्ये पदार्पण (First Movie of Rani Mukerji) करणाऱ्या राणी मुखर्जीला खरी ओळख आमिर खानसोबतच्या 'गुलाम' या सिनेमामुळे मिळाली.

    मुंबई 21 मार्च : बॉलिवूडमध्ये 'मर्दानी' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या राणी मुखर्जीचा (Rani Mukerji) जन्म 21 मार्च 1978 साली कोलकातामध्ये एका बंगाली कुटुंबात झाला होता. अगदी लहानपणापासूनच राणीला अभिनयाची आवड लागली. आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनावर राज करणाऱ्या राणी मुखर्जीच्या घरात आधीपासून अभिनयाचं वातावरण होतं कारण तिच्या घरातील लोकांचाही चित्रपटासोबत संबंध होता. राणीचे वडील राम मुखर्जी बंगाली सिनेमांचे दिग्दर्शक होते. राणीचा आवाज सुरुवातीच्या काळात वादाचा मुद्दा ठरला होता. मात्र, असं असतानाही 2005 मध्ये राणी बॉलिवूडच्या 10 पॉवरफुल लोकांच्या यादीमधील एकटी अभिनेत्री होती. हे राणीच्या अभिनयाचंच श्रेय होतं, की फिल्मफेअरनं सलग तीन वर्ष तिला टॉप अभिनेत्री घोषित केलं होतं. ‘राजा की आएगी बारात’ या सिनेमातून मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत बॉलिवूडमध्ये पदार्पण (First Movie of Rani Mukerji) करणाऱ्या राणी मुखर्जीला खरी ओळख आमिर खानसोबतच्या 'गुलाम' या सिनेमामुळे मिळाली. या सिनेमामुळे अभिनेत्री ‘खंडाळा गर्ल’ या नावानं ओळखली जाऊ लागली. आती क्या खंडाला’ हे गाणं प्रचंड गाजलं आणि या सिनेमातील राणीचं कामंही प्रेक्षकांच्या भलतंच पसंतीस पडलं. मात्र, या सिनेमामधील राणीचा आवाज खरा नव्हता. तिचा आवाज डबिंग आर्टिस्टकडून डब करुन घेण्यात आला होता. राणी मुखर्जीचा पहिला मोठा यशस्वी सिनेमा ठरला तो शाहरुखसोबतचा ‘कुछ कुछ होता है’. या सिनेमात राणीचा रोल खूप मोठा नव्हता. मात्र, या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीनं अनेक दिग्दर्शकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. राणीचे ‘बादल’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’ आणि ‘मुझसे दोस्ती करोगे’सारखे चित्रपट विशेष कमाल करू शकले नाही. मात्र, विवेक ओबेरॉयसोबतचा तिचा ‘साथिया’ हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमासाठी अभिनेत्रीला फिल्मफेअरही मिळाला. राणीच्या ‘हम तुम’, ‘वीर-ज़ारा’, ‘बंटी और बबली’ आणि ‘ब्लॅक’ या सिनेमांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bollywood actress

    पुढील बातम्या