या तिहेरी तलाकमुळे मीना कुमारी यांचं आयुष्यच संपलं

या तिहेरी तलाकमुळे मीना कुमारी यांचं आयुष्यच संपलं

मीना कुमारीच्या पतीनं कमाल अमरोही यांनी रागाच्या भरात मीना कुमारींना तीन वेळा तलाक म्हटलं. आणि मग पश्तात्ताप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काही उरलं नाही.

  • Share this:

22 आॅगस्ट : अभिनेत्री मीना कुमारीनं आपल्या वैयक्तिक आयुष्यात तिहेरी तलाकचं दु:ख सहन केलं होतं.  मीना कुमारीच्या पतीनं कमाल अमरोही यांनी रागाच्या भरात मीना कुमारींना तीन वेळा तलाक म्हटलं. आणि मग पश्तात्ताप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काही उरलं नाही.

मीना कुमारीचं लग्न 'पाकिजा'चे दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याबरोबर झाले होते. एक दिवस दोघांमध्ये काही वाद झाले. अमरोहींनी रागानं तीन वेळा तलाक शब्द उच्चारला. त्यावेळच्या  इस्लामिक कायद्याप्रमाणे दोघांचं लग्न तुटलं.

पण त्यांना काही मीना कुमारीला गमवायचं नव्हतं. पण धर्मगुरूंनी सांगितलं की आता लग्न करता येणार नाही. त्यासाठी मीना कुमारीला हलाला करावं लागेल. हलाला म्हणजे घटस्फोटित महिलेनं दुसऱ्या कुणाशी लग्न करायचं. सुहागरात साजरी करायची. मगच ती आपल्या पहिल्या पतीसोबत पुन्हा लग्न करू शकते.

कमाल अमरोहींनी मीना कुमारीचं लग्न आपला जवळचा मित्र अमान उल्लाह खान यांच्याशी केलं. अमान उल्लाह खान हे झीनत अमानचे वडील. हलालाची प्रथा पाळल्यानंतर मीना कुमारीनं पुन्हा कमाल अमरोहींशी लग्न केलं.

पण या सर्व गोष्टींचा परिणाम मीना कुमारींच्या तब्येतीवर झाला. त्या पूर्ण उन्मळून गेल्या. त्यांनी म्हटलं, ' धर्माच्या नावाखाली आपलं शरीर दुसऱ्या पुरुषाच्या हातात द्यावं लागतं तेव्हा आपण आणि वेश्येत फरक तो काय?'

त्यानंतर मीना कुमारी दारू प्यायला लागल्या. त्यांची तब्येत बिघडतच चालली. आणि वयाच्या 39व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

First published: August 22, 2017, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading