• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Birthday special : नेपोटिझम नव्हे स्टार किड्सनाही असतो स्ट्रगल; बॉबी देओलनं सांगितली स्वतःची गोष्ट

Birthday special : नेपोटिझम नव्हे स्टार किड्सनाही असतो स्ट्रगल; बॉबी देओलनं सांगितली स्वतःची गोष्ट

अभिनेता बॉबी देओलचा ( boby deol birthday) आज वाढदिवस आहे. सध्या बॉबी देओल आपल्या आश्रम (aashram) या वेबसीरिजमुळे चांगलाच चर्चेत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 27 जानेवारी : अभिनेता बॉबी देओलचा (boby deol) आज वाढदिवस आहे. तसं पाहिलं तर बॉबीच्या करिअरच्या दृष्टीनं 2020 हे वर्ष खास ठरलं असं म्हणावं लागेल. कारण, याच वर्षी बॉबीचा क्लास ऑफ 83(class of 83)  आणि आश्रमसारखी (aashram) हीट वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे दोन्हीतल्या बॉबीच्या कामाची प्रेक्षकांनी भरपूर प्रशंसाही केली. काही काळ बॉबी पडद्यापासून दूर होता. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यानी सांगितलं, की मला काम मिळणं बंद झालं होतं. मीसुद्धा माझ्या करिअरमध्ये खूप स्ट्रगल केलं आहे. खूप चढउतार पाहिले आहेत. एक वेळ अशी आली, की मी सगळं काही सोडून देण्याचा विचार केला. मात्र, कधीही हार मानायची नाही, अशी माझी विचारसरणी होती. आयुष्यात कधीच स्ट्रगलसमोर गुडघे टेकवू नका. फक्त इमानदारीनं आपलं काम आणि हार्ड वर्क करत राहा, असंही तो म्हणाला. अभिनयातील या ब्रेकनंतर 'रेस 3'(race 3) माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला, असं बॉबीनं सांगितलं. कारण, यानंतर मला अक्षयसोबत (akshay kumar) हाऊसफुल्ल चित्रपट मिळाला. रेस 3 नंतर मला खूप चांगल्या ऑफर मिळू लागल्या. बॉलिवूडमध्ये सध्या सुरु असलेल्या इनसाइडर आणि आउटसाइडर या मुद्द्यावर बॉबी म्हणाला, की इनसाइडर किंवा स्टारकिड असल्यास पहिला चित्रपट मिळणं अवघड नसतं. मात्र, त्यानंतर तुमचा अभिनय आणि मेहनत पाहूनच तुम्हाला काम दिलं जातं. इनसाइडर असूनही माझ्या आयुष्यात खूप कठिण प्रसंग आले आणि आज मी जिथे आहे, तिथे खूप समाधानी आहे, असं बॉबी म्हणाला. सोशल मीडियावर ट्रोल होण्याच्या मुद्द्यावर बॉबी म्हणाला, की प्रत्येक माणसाचं स्वतःच असं एक मत असतं. स्वतःचा विचार असतो. सगळेच लोक तुमच्यावर प्रेमच करतील हे गरजेचं किंवा शक्यही नाही. त्यामुळे, मी कधीच माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येणार कमेंट वाचत नाही. मात्र, मी खरं तर लोकांचे आभार मानतो कारण त्यांनी मला प्रेमच जास्त दिलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: