भाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो

भाभाजी फेम सौम्या टंडनने 18 जानेवारीला एका लहान चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे.

  • Share this:

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सौम्या टंडनने 18 जानेवारीला एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे. (रविवारी) 20 जानेवारीला सौम्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला असून ती आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत.

सोम्या टंडनने याआधी अॅण्ड टिव्हीच्या 'भाभीजी घर पे है...' या मालिकेत काम केलं होतं. खरतर याच मालिकेमुळे सोम्या घराघरात पोहचली होती पण गरोदर असल्यामुळे तिला ही मालिका सोडावी लागली होती.

सौम्याने गरोदरपणात आराम करण्यासाठी छोट्या पडद्याला राम राम केला होता. यानंतर गायब झालेली सौम्या बऱ्याच महिन्यानंतर एका फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

सौम्या टंडनने काही दिवसांपूर्वी मॅटरनिटी फोटोशूट केलं होतं आणि हे फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यावेळेस खरतर सौम्याच्या फॅन्सना ती गरोदर असल्याचं समजलं होतं.

काही तासांपूर्वी सौम्याने तिच्या लहान मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या मुलाचा चेहरा फार स्पष्टपणे दिसत नाही. सौम्या आणि बाळ दोघंही सुखरुप असल्याने पतीच्या आनंदात आणखी भर पडली आहे.

सौम्याने तिच्या लहान मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या मुलाचा चेहरा फार स्पष्टपणे दिसत नाही. सौम्या आणि बाळ दोघंही सुखरुप असल्याने पतीच्या आनंदात आणखी भर पडली आहे.

अॅण्ड टिव्हीच्या मालिके आधी सौम्यानं 2008 साली शाहीद कपूर आणि करीना कपूरसोबत 'जब वी मेट' सिनेमात काम केलं होतं, या चित्रपटात सौम्याची भूमिका अतिशय छोटी होती पण करिना कपूरच्या बहिणीची भूमिका सौम्यानं अत्यंत सुंदररित्या पार पाडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या