'बाहुबली'च्या कुंकवाची चित्तरकथा

'बाहुबली'च्या कुंकवाची चित्तरकथा

प्रत्येकाच्या कपाळावर वेगवेगळ्या प्रकारचं कुंकू लक्ष वेधून घेतं. पण या कुंकवाची कहाणी वेगळी आहे. प्रत्येकाच्या कपाळावरचं कुंकू बरंच काही सांगतंय.

  • Share this:

24 मे : 'बाहुबली 2'नं बाॅक्स आॅफिसवरचे सर्व रेकाॅर्डस् मोडले. बाहुबलीमधल्या व्यक्तिरेखांनी आपला खास ठसा उमटवला.  अमरेंद्र बाहुबली असो नाही तर शिवगामी. प्रत्येकाच्या कपाळावर वेगवेगळ्या प्रकारचं कुंकू लक्ष वेधून घेतं. पण या कुंकवाची कहाणी वेगळी आहे. प्रत्येकाच्या कपाळावरचं कुंकू बरंच काही सांगतंय.

शिवगामी

शिवगामीच्या कपाळावरचं लाल कुंकू, त्याला सोनेरी चमक. हे कुंकूच तिची व्यक्तिरेखा उलगडवून दाखवतंय. एवढ्या मोठ्या साम्राज्याची सम्राज्ञी. मेरा वचनही मेरा शासन है म्हणणारी. लाल आणि मोठ्या कुंकवावरूनच तिचा करारी स्वभाव अधोरेखित होतो.

महेंद्र बाहुबली

 

याच्या कपाळावर शिवलिंग आहे. शक्ती आणि धैर्य यांचं प्रतिक. त्याचा सुडाचा प्रवास, भल्लादेवशी झालेली लढाई आणि त्यात शिवलिंगाची झालेली मदत हे सर्व या टिळ्याशी जुळतं आहे.

देवसेना

देवसेना ही फक्त बाहुबलीची बायको नव्हती. तर ती एक वीरांगनाही होती. लढवय्यी होती. म्हणून तिचं कुंकूही वेगळं. तिच्या कुंकवाचा आकारही वेगळा आहे.

भल्लादेव

याच्या कपाळावर उगवत्या सूर्याचं चिन्ह. महिष्मती राज्याचा हा राजा. म्हणूनच त्याच्या कपाळी हे चिन्ह.

अमरेंद्र बाहुबली

याच्या कपाळावर चंद्राचं चिन्ह. अमरेंद्र हा शांत आणि जनतेमध्ये प्रिय असलेला. चंद्र शांततेचं प्रतिक. तरीही स्वतंत्र वृत्तीचा आणि न्यायप्रिय. त्याच्या या व्यक्तिरेखेला हा चंद्र साजेसा.

कटप्पा

कटप्पाच्या कपाळावरचं चिन्ह पूर्ण वेगळं. विश्वासू सेवकाचं ते प्रतिक. शिवगामीसाठी, राज्यासाठी कटप्पानं आपली स्वामीभक्ती सिद्ध केलीच. शिवाय तो महेंद्र बाहुबलीशीही प्रामाणिक राहिला.

First published: May 24, 2017, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading