ऑस्कर विजेत्या निर्मात्याची मुलगी म्हणते, पैशासाठी मला व्हायचंय पॉर्नस्टार

ऑस्कर विजेत्या निर्मात्याची मुलगी म्हणते, पैशासाठी मला व्हायचंय पॉर्नस्टार

हॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर स्टीवन स्पीलबर्ग यांची मुलगी मिकेलानं 23 व्या वर्षी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकत सर्वांना धक्का दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : पॉर्न इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं त्यावेळी या गोष्टींचा अंदाज लावणं कठीण असतं की त्या लोकांची आयुष्यात त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक पॉर्नस्टार्सनी आतापर्यंत त्याच्या आयुष्यातील वेदनादायी खुलासे केले आहेत. पण अशात हॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर स्टीवन स्पीलबर्ग यांची मुलगी मिकेलानं 23 व्या वर्षी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकत सर्वांना धक्का दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मिकेलानं तिचा हा निर्णय आई-वडीलांना समजल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा केला आहे.

द सननं दिलेल्या वृत्तानुसार मिकेलानं असा खुलासा केला आहे की, पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच तिनं तिचे सोलो पॉर्न व्हिडीओ शूट केले होते. जेव्हा तिनं तिच्या पालकांना पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा त्यांनी तिच्या या निर्णयाचं समर्थन केलं. याशिवाय तिनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या चाहत्यांनाही याबाबत सांगितलं होतं. तिचं म्हणणं आहे की, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी तिनं तिच्या करिअरवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

कधी दिवसाला 40 सिगरेट ओढायचा, आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर

स्टीवन स्पीलबर्ग आणि त्यांची पत्नी अभिनेत्री केट कॅपशॉ यांनी मिकेलाला दत्तक घेतलं आहे. असं म्हटलं जातं. मिकेला अमेरिकेच्या टेनेसी येथील नॅशलिव्हमध्ये राहत असे. मिकेला म्हणाली, माझ्या या निर्णयाबाबत मी माझ्या आई-वडीलांना फेसटाइमच्या वेळी कल्पना दिली होती. माझ्या पालकांना माझ्या सुरक्षेची चिंता होती. ते थोडे हैराण झाले मात्र माझ्या करिअर चॉइसवर ते नाराज अजिबात नव्हते.

ज्याला करायचं होतं डेट, त्याची झाली भेट! रिंकू राजगुरूनं शेअर केला PHOTO

स्टीवन स्पीलबर्ग हे हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि स्क्रीप्ट रायटर आहेत. त्यांनी जुरासिक पार्क, 'इंडियाना जोंस', 'लिंकन' 'सॉ', 'शिंडलर्स लिस्ट' आणि 'सेविंग प्राइवेट रायन' या सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यांच्या अनेक सिनेमांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. फोर्ब्स मासिकाच्या सर्व्हेनुसार स्टीवन यांची एकूण संपती 3.1 बिलियन डॉलर आहे.

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’चा जागतिक स्तरावर नवा विक्रम, केली इतक्या कोटींची कमाई

First published: February 20, 2020, 4:25 PM IST
Tags: hollywood

ताज्या बातम्या