लंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा

लंडनच्या 'मादाम तुसाँ'मध्ये करण जोहरचा मेणाचा पुतळा

लंडनच्या मॅडम तुसाद म्युझियमध्ये आता सुप्रसिद्ध निर्माता करण जोहरचा मेणाचा पुतळा बसवण्यात येणारे. करणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली.

  • Share this:

20 एप्रिल : लंडनच्या जगप्रसिद्ध 'मादाम तुसाँ' म्युझियमध्ये आता सुप्रसिद्ध निर्माता करण जोहरचा मेणाचा पुतळा बसवण्यात येणारे. करणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. 'लंडनची मॅडम तुसाद म्युझियमची टीम माझा मेणाचा पुतळा बनवण्यासाठी फार मेहनत घेतेय आणि त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो,' असं करणने ट्विटरवरून म्हटलंय.

येत्या सहा महिन्यात करणच्या पुतळ्याचं काम पूर्ण होईल. करणची वाढती प्रसिद्धी पाहून मॅडम तुसादमध्ये त्याचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढंच नव्हे तर करण भारतातील असा पहिला सिनेनिर्माता ठरलाय ज्याचा पुतळा मॅडम तुसादमध्ये बसवण्यात येणारे.

First published: April 20, 2018, 5:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading