‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये नवा ट्विस्ट; सोज्वळ गौरीचा होणार मेकओव्हर

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये नवा ट्विस्ट; सोज्वळ गौरीचा होणार मेकओव्हर

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanje Nakki Kay Asat). मालिकेत लवकरच नवा ट्वीस्ट(New Tweest) येणार आहे. साध्या सरळ गौरीचा (Gauri) मेकओव्हर झालेला पाहायला मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 7 मे:  प्रत्येक माणसाच्या सुखाच्या परिभाषा वेगळ्या असतात. त्यानुसार ते लोक आपलं सुख शोधत असतात. मात्र आपलं नशीब आपल्या पुढे जे आणून उभं करतं आणि त्यातून आपण कसा आनंद शोधू लागतो. याचं पार्श्वभूमीवर आधारित मराठी मालिका(Marathi Tv Serial)  म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanje Nakki Kay Asat).  या मालिकेत लवकरच एक नवा ट्वीस्ट(New Tweest)  येणार आहे. साध्या सरळ गौरीचा (Gauri) मेकओव्हर झालेला पाहायला मिळणार आहे. पाहूया काय आहे यामागचं नेमकं कारण,

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्टार प्रवाह वाहिनीवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेत लवकरच एक धम्माल किस्सा पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील मुख्य नायिका म्हणजेच गौरी आपल्याला नव्या रुपात दिसून येणार आहे. आणि हा मेकओव्हर दुसरं कोणी नव्हे तर तिचा नवरा जयदीपचं करणार आहे. मालिकेत दाखविण्यात आलं आहे. गौरीला जयदीपसोबत एका पार्टीमध्ये जायचं असतं. मात्र गौरी त्यासाठी तयार नसते. कारण याआधी ती कधीही अशा पार्टीमध्ये गेलेली नसते. त्यामुळे तिला पार्टीसाठी तयार करण्याची जबाबदारी जयदीपने घेतली आहे.

(हे वाचा: क्षितीश दाते आणि ऋचा आपटेनं केलं लग्न; केवळ 2 तासांत उरकलं शुभमंगल )

स्टार प्रवाहचा हा नवा प्रोमो खुपचं व्हायरल होतं आहे. यामध्ये गौरी पार्टीमध्ये जायला नकार देण्यासाठी नवनवीन अडचणी शोधत आहे. तर जयदीप त्याच्या प्रत्येक अडचणीवर उपाय सांगत आहे. त्यामुळे गौरीला पार्टीत जाण्याशिवाय दुसरा कोणताचं पर्याय नाहीय. त्यामुळे साधी सरळ गौरी लवकरच आपल्याला स्टाईलिश अंदाजात दिसू शकते. हा प्रोमो पाहून चाहतेसुद्धा गौरीला या वेशात पाहायला आतुर झाले आहेत.

(हे वाचा:स्वीटू-ओमच्या प्रेमाला Lockdown चा फटका; अंबरनाथमधील शूटिंग नेलं सिल्वासाला )

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने अगदी कमी वेळेत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान पक्कं केलं आहे. कोल्हापूरच्या मातीतील ही कथा आहे. यामध्ये जयदीप हा अमेरिकेहून शिक्षण घेऊन आलेला एक समजूतदार आणि अन्यायाला वाचा फोडणारा मुलगा दाखविला आहे. तर दुसरीकडे गरीब घरातील मोलमजुरी करणारी सर्व अन्याय सहन करणारी गौरी दाखवली आहे. जयदीपच्या माई जयदीपसाठी गौरीची निवड करतात. आणि त्याला गौरीसोबत लग्नं करावं लागतं. आपण ठरवण्यापेक्षा नशीबचं आपली प्रत्येक गोष्ट ठरवत असतो. आणि आपल्याला त्यातच सुख शोधावं लागतं. असं काहीसं या मालिकेच कथानक आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, मंदार जाधव, गिरीजा प्रभू, माधवी निमकर, सुनील गोडसे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Published by: Aiman Desai
First published: May 7, 2021, 4:29 PM IST

ताज्या बातम्या