डोहाळे जेवणात अभिनेत्रीनं केला भन्नाट डान्स; Video होतोय व्हायरल

डोहाळे जेवणात अभिनेत्रीनं केला भन्नाट डान्स; Video होतोय व्हायरल

दीपा गर्भवती असताना इतक्या जोश मध्ये नृत्य करतेय हे पाहून तिचे चाहतेही अवाक् झाले आहेत. तर या व्हिडीओ वर तिला अनेक कमेंट्स ही मिळाल्या आहेत

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : स्टार प्रवाह (Star Pravah ) वाहिनी वरील प्रचंड चर्चेत असलेली मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang maza vegla)  सध्या एका वेगळ्या वळणावर आली आहे. कार्तिक आणि दीपाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. तर लवकच ते दोघेही आईबाबा होणार आहेत. दीपाच्या डोहाळे जेवनाचा कार्यक्रमही जंगी थाटात पार पडला. पण याच सोहळ्यातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात दीपा भन्नाट डान्स करत आहे.

मालिकेत नुकताच हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी इनामदार कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली होती. या वेळी संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. या निमित्ताने कुटुंबातील महिलांनी एक सुंदर नृत्य सादर केलं. दीपाने म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे ने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.  दीपा गर्भवती असताना इतक्या जोश मध्ये नृत्य करतेय हे पाहून तिचे चाहतेही अवाक् झाले आहेत. तर या व्हिडीओ वर तिला अनेक कमेंट्स ही मिळाल्या आहेत.

हे वाचा - अखेर श्रीधरचा खेळ संपला; ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेचा असा होणार शेवट

हे ऐकून रेश्माचे व मालिकेचे चाहते अवाक् झाले असले तरीही या मध्ये एक ट्विस्ट आहे. तो म्हणजे हा डान्स दीपाने नाही तर रेश्मा ने केला आहे. म्हणजेच शुटींग संपल्यानंतर रेश्मा तसेच अन्य कलाकारांनी ‘वाथी कमिंग’ (Vathi coming) या ट्रेंडीग गाण्यावर ताल धरला होता. त्यामुळे व्हिडीओला चांगलेच लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले असले तरीही दीपा आणि कार्तिकच्या संसाराला विघ्न लागलं आहे. व रेश्माच्या पोटातील बाळ आपलं नसल्याचं कार्तिक ला वाटत आहे. मेडीकल रिपोर्टनुसार कार्तिक कधीही बाप होऊ शकत नसल्यातं कार्तिकला समजल होत. त्यामुळे दीपावर मनापासून प्रेम करणाऱ्या कार्तिकचा असा समज झाल्याने दीपाला वाईट वाटत आहे. त्यामुळे आता पुढे नक्की घडणार हे पाहण महत्त्वाचं आहे.

Published by: News Digital
First published: April 17, 2021, 7:30 PM IST

ताज्या बातम्या