स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच याचा एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये पश्या त्याच्या तात्यावर म्हणजे टॅम्पोवर अंजीसाठी I LOVE U असं लिहितो. मग काय तो अंजीला हे खास सरप्राईज देण्यासाठी अंजीला घरातून बाहेर घेऊन येतो. अंजीला म्हणतो की, बघ तुला दिसले का..वाच की....अंजी म्हणते कुठे कायच दिसत नाही. पश्या पाहतो तर काचेवर काहीच लिहिलेले दिसत नाही. तेवढ्यात त्याचा लहान भाऊ तिथं येतो आणि काचेवर पाणी मारतो. त्यावेळी पश्याला कळते आपला प्रयत्न नेमका कुणामुळे फसला. वाचा - 'मुलगी झाली हो'च्या सेटवर दाखल झाली संभाजी ब्रिगेड ; शुटिंग बंद पाडत... आता या सगळ्यानंतर प्रश्न पडला आहे की, पश्या अंजीसमोर मनातील भावना व्यक्त करू शकेल का? शिवाय अंजी देखील त्याच्या प्रेमाचा स्वीकार करेल का..याबद्दल येणाऱ्या भागातच समजेस. मात्र पश्या आणि अंजी यांची जोडी प्रेक्षकांची अवडती जोडी आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. अडाणी पश्याने अंजीसाठी लिहियाला व इंग्रजी वाचायला व बोलायला शिकला आहे. यावरून त्याचे अंजीविषयी प्रेम कळत. म्हणून तर प्रेक्षकांना साधाभोळा पश्या आणि बडबडी आणि भांडखोर अंजीची जोडी आवडते.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.