Home /News /entertainment /

अंजीसाठी कायपण! आधी इंग्रजी शिकला आता 'या' दंबग पोलिसाच्या मदतीने पश्या बनणार मुंबईचा फौजदार

अंजीसाठी कायपण! आधी इंग्रजी शिकला आता 'या' दंबग पोलिसाच्या मदतीने पश्या बनणार मुंबईचा फौजदार

अंजीसाठी कायपण! आधी इंग्रजी शिकला आता 'या' दंबग पोलिसाच्या मदतीने पश्या बनणार मुंबईचा फौजदार

अंजीसाठी कायपण! आधी इंग्रजी शिकला आता 'या' दंबग पोलिसाच्या मदतीने पश्या बनणार मुंबईचा फौजदार

अंजी आणि पश्या ही सर्वांची लाडकी जोडी नेहमीच हटके काही तरी करत असते. पश्याचं अंजीवर असलेलं प्रेम त्याला आता थेट मुंबईचा फौजदार करणार आहे. पाहा काय घडणार मालिकेच्या येत्या एपिसोडमध्ये.

  मुंबई,15 जून: स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार ( Star Pravah) मालिकेती अंजी आणि पश्या ही मस्तीखोर जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी ठरली आहे. दोघांचं खट्याळ असणं प्रेक्षकांना नेहमी भावलं. अंजीसाठी पश्या काहीही करायला तयार असतो. अंजीसाठी अडाणी पश्या इंग्रजी शिकला आणि तर पश्या थेट मुंबईचा फौजदार होणार आहे. दबंग पोलीस अंकुश शिंदेच्या मदतीनं पश्या अंशीचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे. आता तुम्ही म्हणाल पश्या आणि अंकुश एकत्र कसे येणार आहे. तर  स्टार प्रवाहवरील सगळ्यात मालिका सध्या जोरदार सुरू आहेत. एकाहून एक नायक- नायिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. पण जेव्हा दोन नायक एकत्र येतात तेव्हा मालिकेत वेगळीच रंगत पाहायला मिळते. स्टार प्रवाहवर दोन मालिकांचा महासंगम प्रेक्षकांना या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.  सहकुटुंब सहपरिवार (sahkutumb sahparivar)  आणि अबोली (Aaboli )  मालिकेचे कलाकार एकाच एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहेत.  दोन मालिकांचा महासंगम म्हणजे मालिकेचा भागही स्पेशल असणार आहे. सहकुटुंब सहपरिवार आणि अबोलीचा महासंगम एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या महासंगंमात आपण पाहणार आहोत की, अंकुश शिंदेच्या मदतीनं पश्या अंजीचं स्वप्न करणार आहे. रुबाबदार अंकुश शिंदे पश्याला मार्गदर्शन करुन अंजीचं स्वप्न पूर्ण करण्यात मदत करणार आहे.  पश्याही पोलिसांच्या रुबाबात बुलेटवर बसून अंजीला घेऊन जाताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  अंजी आणि पश्या तात्यामध्ये बसून जात असताना बुलेटवरुन उतरणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर अंकुश शिंदेला पाहतात. अंकूशला पाहून अंजी तिच्या मनातील इच्छा पश्याला बोलून दाखवते. ती म्हणते, 'खाकी वर्दीतील माणसं किती रुबाबदार दिसतात. मलाही खाकीवाल्याबरोबर लग्न करायचं होतं'.  अंजीचं म्हणणं पश्याच्या जिव्हारी लागत आणि तो अंकुशला भेटून मलाही पोलीस व्हायचं असल्याचं सांगतो. 'मलाही वर्दी घालायची आहे. अंजीचं पोलीस होण्याचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे', असं म्हणतो. त्यावर अंकुश त्याला 'आधी खाकी मग बाकी', असा दमदार डायलॉग ऐकवून कॉन्फिडन्स देतो. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte मालिकेत होणार नव्या पात्रांची एंट्री; येत्या भागात पाहायला मिळणार कलाकारांची धम्माल मालिकेचा हा प्रोमो पाहून नेमकं मालिकेत काय आणि कसं घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अंकुश पश्याला कशी मदत करणार? खरंच पश्या पोलीस होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याचप्रमाणे अंकुशसह अबोलीही महासंगम भागात दिसणार का असंही प्रेक्षक विचारत आहेत. प्रोमोच्या शेवटी पश्या पोलीसी खाकीत अंजीला सॅलूट करताना दिसत आहे. त्यामुळे पश्या खरंच पोलीस होणार की हे त्याच स्वप्न असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. सहकुटुंब सहपरिवार मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. संपूर्ण कुटुंबानं संपूर्ण जेजूरीच्या खंडोबाचं दर्शन घेऊन नव्या प्रवासला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे अबोली मालिकेतही अंकुश आणि अबोली यांच्यात प्रेमाच्या कळी खुलण्यास सुरुवात झाली आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Tv actors, TV serials

  पुढील बातम्या